====≠===================
*गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार*
=====================
स्नेह मिलन सोहळ्यात अनेक सदाबहार गीताने जनमंच सदस्य मंत्रमुग्ध झाले.
—————————————-
जनमंच एक चळवळ आहे. जनमंच हा एक ध्यास आहे .जनमंच लोकहितकारक प्रश्नांना हाताळत न्यायिक मार्गाने चालणारा विचार आहे .जनमंच हा सर्वसामान्य माणसाच्या मनातील आत्मविश्वास आहे .जनमंच लोकशाहीला जागृत करणारे व्यासपीठ आहे. जनमंच एक आजच्या युगातील प्रबोधन आहे आणि जनमंच ही शेवटच्या माणसाचा आधार आहे. जनमंच ही खऱ्या लोकशाहीची कास आहे आणि म्हणूनच जनमंच हा प्रत्येकाच्या मनातील जागृत असणारा दृढ विश्वास आहे.
समाजातील विविध प्रश्नांना डोळसपणे हाताळत जनमंच ही सेवाभावी संस्था गेली अनेक वर्षापासून काम करीत आहे. जनमंच नागपूरच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाने. २०२४ ला शिवाजी प्रतिष्ठान लाॅन मध्ये जनमंच स्नेहमिलन सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सदर सोहळ्यात विविध क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शक गणमान्य मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. कार्यक्रमात चंद्रपूर आदिवासी बहुल जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात विविध विषयांना हाताळत सातत्याने गेली अनेक दशकापासून काम करीत असलेले, केंद्र शासनाच्या जिल्हा युवा पुरस्कार , सामाजिक ,महाराष्ट्र समाज वैभव व अनेक राज्य राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित असलेले .पत्रकारिता व कला क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले युवा व्यक्तिमत्व जनमंच सदस्य रवींद्र तिरानिक यांचा कार्याचा गुणगौरव करून सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ वक्ते जनमंचचे मार्गदर्शक प्रा.शरद पाटील, जनमंचचे अध्यक्ष राजीवजी जगताप ,रमेश बोरकुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रसंगी गुणगौरव सोहळ्यात सध्या ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षण घेत असलेल्या तत्पूर्वी बारावीत गणित या विषयात उच्चांक मिळवत मेरिट प्राप्त आयुष प्रमोद पिंगे, तसेच से इंडिया नॅशनल लेवल इंदोर येथे संपूर्ण भारतातील नामांकित कॉलेज सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चा प्रथम क्रमांक प्राप्त उर्वी प्रमोद रामेकर, मुर्तीजापुर जनमंच संयोजक प्रा.सुधाकर गौरखेडे सन्मान पत्र व वृक्ष भेट देऊन गुणगौरव करीत सत्कार करण्यात आला . शिवाजी प्रतिष्ठान लाॅन सेवाभावी नागपुरे परिवार यांचाही जनमंच आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात वृक्षवल्ली भेट देऊन पारिवारिक सन्मान झाला.
जनमंच स्नेहमिलन सोहळ्यात गायक श्रीकांत देवळे, सुनील भुसे श्रीकांत दौड, अॅड. मनोहर रडके, प्रणय पराते, संजय जगताप आदींनी याप्रसंगी सदाबहार गीते गाऊन उपस्थित सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या निवेदिका डॉ.संध्या देवळे यांनी सूत्र संचालन केले. तर आभार जनमंच महासचिव कार्यक्रम संयोजक विठ्ठल जावळेकर यांनी केले .प्रसंगी जनमंच मधील असंख्य गणमान्य मान्यवर मंडळीची आवर्जून उपस्थिती होती.
=======≠================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069