*अनाथ मुलाला मारहाण प्रकरणी जि प शिक्षकावर अदखलपात्र गुन्हा दाखल*

0
36

======================

*शेतात शेळ्या चारल्याचा आरोप*

===================

*वरोरा प्रतिनिधी धर्मेंद्र शेरकुरे*

====================

वरोरा तालुक्यातील शेगाव खुर्द येथे आदिवासी अनाथ मुलाला शिक्षकांकडून मारहाण झाल्याची घटना घडली, असुन आरोपी शिक्षकावर वरोरा पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे , वृत्त असे कि वरोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागरी जवळील शेगाव खुर्द येथील अर्चना शंकर पवार ह्या शेळ्या चराई चे काम करतात, त्यांचे सोबत अमित श्रीकृष्ण पवार वय १३ वर्षे अनाथ हा मुलगा गेल्या चार महिन्यांपासून मोठ्या आई कडे राहतो, दिनांक २५/१/२०२४ला सकाळी शेळ्या चरत असतांनाच अमित हा माकडांना हाकलून लावण्यासाठी गेल्याने बकऱ्या जवळच्या शेतात गेल्या , तुझ्या शेळ्या माझ्या शेतात शिरून माल चारला म्हणून शेतमालक श्री रामचंद्र बालाजी सालेकर शिक्षक रा शेगाव खुर्द यांनी तेरा वर्षांच्या अमित पवार नामक आदिवासी मुलाला लाथा बुक्यांचा मार दिला, अमित हा घरी रडत गेला,झालेली हकिकत घरी अर्चना शंकर पवार हिला सांगितले, पवार यांनी सालेकर यांना विचारणा केली असता उद्धट पणे बोलू लागला, अश्लील शिवीगाळ करून जातीवाचक शिव्या दिल्या, यावरून अर्चना पवार यांनी रामचंद्र सालेकर यांचे विरुद्ध वरोरा पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता कलम ३२३,५०४, अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास वरोरा पोलिस करत आहे . प्रतिक्रिया -अर्चना शंकर पवार मुलाची मोठी आई :-माझ्या अनाथ बहिण लेकाला जबरण मारहाण करण्यात आली,व जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी आली आहे,या गावात माझे आदिवासी पारधी समाजाचे एकच घर आहे त्यामुळे आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे,एवढे होऊनही पोलीसांनी गैरअर्जदार यांचेवर अटकेची कारवाई केली नाही,अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक करावी, आम्हाला ठाणेदार साहेबांनी न्याय मिळवून द्यावा.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here