*शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी 12 फेब्रुवारीला तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण*

0
31

=========================

*शेतकर्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन* 

=========================

*किशोर डुकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती*

=========================

    *चंद्रपूर* 

========================

चंद्रपुर
दरवर्षी शेतकर्‍यांना अस्मानी व सुलतानी संकटाचा शेतपिकांना फटका बसत आहे. मात्र संकटांना न जुमानता शेतकरी शेती करत आहे. त्यांच्या शेतपिकांना भाव मिळत नाही. शेतपिकांचे नुकसानीबाबत मायबाप सरकार कडून मदत दिली जात नाही. शेतकर्‍यांच्या विविध समस्या कडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 12 फेब्रुवारीला वरोरा तहसील कार्यालयासमोर बैलबंडीवर बसून साखळी उपोषण करणार असल्याची माहिती शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली असून या साखळी उपोषणाला शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे .
केंद्र व राज्य सरकार शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबवित आहे मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांना या योजनांचा लाभ होताना दिसत नाही. यावर्षी हवामान बदलामुळे हातात आलेले सोयाबीन पीक येलो मोझ्याक रोगामुळे नष्ट झाले. त्या शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपये मदत देण्यात यावी, सरसकट पीक विमा आठ दिवसात देण्यात यावा, कापसाला प्रती क्विंटल दहा हजार रुपये व सोयाबीनला प्रती क्विंटल आठ हजार रुपये भाव देण्यात यावा, महात्मा ज्योतिबा फुले बँक कर्ज चालू शेतकऱ्यांना कर्जमाफी आठ दिवसात देण्यात यावी, ज्या शेतऱ्यांचे शेत नदी-नाल्याला लागून आहे अश्या शेतकऱ्यांना पुर बुडाई आठ दिवसात देण्यात यावी, जिल्ह्यामध्ये शेतमाल हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, शेतकरी हे रजिस्टर कागदपत्रे घेऊन फेरपार करण्यासाठी जातात मात्र फेरफार करण्यासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, शेतपांदन रस्ते शासकीय मोजमाप करुन आठ दिवसात मोकळे करण्यात यावे, यासह शेतकर्‍यांच्या इतर समस्या व मराठा समाज यांना सगेसोयरे बाबत सरकारने काढलेला आदेश रद्द करण्यात यावे, आदि मागण्या घेऊन शेतकरी नेते किशोर डुकरे हे वरोरा तहसील कार्यालयासमोर बैलबंडीवर बसून साखळी उपोषण करणार आहे.

============================

या साखळी उपोषणात चंद्रास मोरे, संदीप वासेकर, पुष्पाकर खेवले, प्रशांत श्रीराने, प्रवीण बदकी, निखिल तिखट, विशाल देठे, तुकाराम निब्रड, माधव जिवतोडे, माणिक डुकरे, अनिल चौधरी, राहुल देठे, महिंद्रा गारघाटे, मधुकर चौधरी, गजानन बदकी, पाडुरंग गोरकार, आकाश धवर्ण, विशाल मोरे, आदींचा सहभाग राहणार आहे.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here