*सावली येथील विविध विकास कामांसंदर्भात आढावा बैठक*

0
26

========================

*विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती*

===========≠============

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सावली तालुक्यातील युवा खेळाळूंना विविध स्पर्धांकरिता प्रोत्साहित करण्या हेतू तालुका स्तरावरील क्रीडा संकुलात विविध विकास कामांसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी 12 कोटी रुपये मंजूर करून दिले. यासाठी तालुका क्रीडा संकुलाची जागा नियोजित करून प्रशासकीय स्तरावर आवश्यक योग्य व शीघ्र पाठपुरावा करून विकास नियोजना हेतू सावली येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

======================

आयोजित आढावा बैठकीस अध्यक्ष म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार,तहसीलदार परिक्षीत पाटील, ठाणेदार जीवन राजगुरु, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोहने, माजी तालुका अध्यक्ष राजेश सिद्धम, नगराध्यक्ष लता लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यापवार, क्रीडा विभागाचे अधिकारी तथा अन्य सर्व विभागाचे अधिकारी, नगर पंचायतीचे नगर सेवक व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी क्रीडा संकुल करिता जागा उपलब्ध करून त्यामध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, खो – खो, बास्केट बॉल, फुटबॉल, हॉकी, धावपट्टी, सभामंच, संरक्षण भिंत स्वच्छतागृह , प्रकाश झोता करिता हाय मॅक्स,व सर्व सुविधा तयार करण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. क्रीडा संकुलाच्या नियोजित जागे करिता जलद गतीने पाठपुरावा करून जागा उपलब्ध करून देणे यासाठी तातडीने प्रयत्न करावे असे निर्देश यावेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तर येणाऱ्या काळात सावली येथील क्रीडा संकुलनामध्ये ग्रामीण भागातील खेळाडू विविध खेळांमध्ये स्पर्धांपूर्वी प्रशिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर तालुक्याचे नाव मोठे करणार असा आशावाद याप्रसंगी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. यावेळी प्रशासनाचे सर्व विभागाचे अधिकारी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच नगरपंचायतीचे नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here