*अमरावतीचा विजय भोयर ठरला आमदार श्री चा मानकरी तर अकोल्याच्या शेख सलिमने पटकविला बेस्ट पोझर ऑफ विदर्भचा मान*

0
33

==========================

बॉडी  बिल्डिंग स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, निलेश दगडेच्या शो ने भरली  आयोजनात रंगत

 ===========================

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवाला सुरवात करण्यात आली आहे. दरम्यान डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अॅंड फिटनेस स्पोट्र्स असोसिएशन चंद्रपूर यांच्या सहकार्याने चंद्रपूर महानगरपालिका पटांगणावर पार पडलेल्या भव्य विदर्भ राज्यस्तरीय बॉडी बिल्डींग अंजिक्यपद स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर आमदार श्री चा मानकरी ठरला आहे तर अकोल्याच्या शेख सलिमने बेस्ट पोझर आॅफ विदर्भचा मान मिळविला आहे. यवतमाळच्या महोम्मद शहजाद यांना बेस्ट इम्प्रुव्हड आॅफ  ईअर चा पूरस्कार मिळाला आहे. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरित करण्यात आले.

============================

यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, मुंबईचे प्रसिध्द बाॅडी बिल्डर निलेश दगडे, माजी नगर सेवक पप्पू देशमूख, सुर्यकांत खनके, माता महाकाली महोत्सव समीतीचे कोषाध्यक्ष पवन सराफ, डाॅ. अशोक वासलवार, सुभाष बोमिडवार, अजय वैरागडे, श्याम धोपटे, आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती

=============================

सदर स्पर्धा 55, 60, 65, 70, 75 आणि  खुला अशा सहा गटात घेण्यात आली. यात 55 वजन गटात चंद्रपूरचा सुरज तिवाडे, 60 किलो वजन गटात बुलढाणाचा दत्तात्रय सावरकर, 65 किलो वजन गटात मोहमद सहजाद, 70 किलो वजन गटात शेख सलिम, 75 किलो वजन गटात अकोल्याचा साहेब साहिल तर खुल्या गटात अमरावतीचा विजय भोयर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत चंद्रपूरच्या बाॅडी बिल्डरनेही घवघवीत यश प्राप्त केले आहे. यात चंद्रपूरच्या शिवाजी वाकोडे याने 55 वजन गटात तिसरा क्रमांक, संकेश भगत पाचवा क्रमांक, 65 किलो वजन गटात शीव कुमार चौहान यांनी 5 वा क्रमांक, 70 किलो वजन गटात शुभम उराडे याने 5 क्रमांक पटवीला आहे. यावेळी आमदार  श्री ठरलेल्या विजय भोयर यांना  51 हजार 111 रुपये व ट्रॉफी, बेस्ट पोझर ठरलेल्या शेख सलिम याला 31 हजार 111 रुपये ट्रॉफी  आणि बेस्ट इम्प्रुव्हसाठी महोम्मद शहजाद याला 21 हजर 111 रुपये आणि ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी मुंबईचे प्रसिध्द बाॅडी बिल्डर निलेश दगडे यांनी स्टेज शो करत कार्यक्रमात रंगत भरली. त्यांचा शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.        ============================ चंद्रपूर,  अमरावती, अकोला, बुलढाना, वासिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर येथील जवळपास 70 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी  चंद्रपूरचे दिलिप शेंगारप, नागपूरचे अरुन देशपांडे , वेनु गोपाल, अकोल्याचे संजय देशमूख , चंद्रपूरचे नरेंद्र भुते , दिलीप करकाडे, नागपूरचे चंद्रशेखर वनकर,  चंद्रपूरचे शेख साजित, पन्नालाल बहोरिया आदींनी पंच म्हणून उत्तम गामगिरी बजावीली. या आयोजनाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडचे प्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवार, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक राम जंगम, नितेश गवळी, कार्तिक बोरेवार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन नासिर खान यांनी केले.

============================

बॉडी  बिल्डग क्षेत्रात चंद्रपूरचे नाव गौरवांकीत करा – आ. किशोर जोरगेवार

=============================

श्री माता महाकाली क्रिडा महोत्वाच्या माध्यमातून आपण चंद्रपूरातील बाॅडी बिल्डरांना मोठे मंच उपलब्ध करुन देत आहोत. यात प्रसिध्द बाॅडी बिल्डरांना आपण आमंत्रीत करुन येथील बाॅडी बिल्डरांना प्रोत्साहीत करण्याचे काम करत आहोत. यंदा हे तिसरे वर्ष असून दरवर्षी यात स्पर्धकांचा सहभाग वाढत चालला आहे. हे या आयोजनाचे यश आहे. दरवर्षी असे आयोजन आपण करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. आजचा युवक व्यसनाकडे वळत आहे. मात्र अशात आपण शरिर सुदृढ करण्याच व्यसन अंगीकारल आहे. आपण या क्षेत्रात स्वताचे  आणि पर्यायाने चंद्रपूरचे नाव गौरवांकीत करावे असे यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. तर या प्रसंगी बाॅडी बिल्डर यांना मार्गदर्शन करतांना निलेश दगडे म्हणाले की, चंद्रपूरात ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेली गर्दी उत्साह वाढविणारी आहे. मुंबई सारख्या शहरात होणा-या आयोजना सारखेच हे आयोजन असून हे उत्तम आयोजन आहे. या शहरात बाॅडी बिल्डिंग खेळाला दिल्या जात असलेले प्रेम मनोबल वाढविणारे आहे. बाॅडी बिल्डींग क्षेत्रात येण्यासाठी ईच्छुक असलेल्या युवकांमध्ये शिस्त असली पाहिजे. या क्षेत्रात उद्या या शब्दाला जागा नाही. आजची कसरत आजच केली पाहिजे. यात खंड पडू देउ नका. खानपान योग्य ठेवा असे ते यावेळी म्हणाले.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here