मोतीबिंदू तपासणी शिबिराचा ३०० रुग्‍णांनी घेतला लाभ

0
37

============================

५० रुग्‍णांना सेवाग्राम येथे शस्‍त्रक्रियेसाठी नेण्‍यात आले

============================

श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेचा स्‍तुत्‍य उपक्रम

===========================

राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा जिल्‍हयाचे पालकमंत्री मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख मार्गदर्शनाखाली रुग्‍ण सेवा हिच आरोग्‍य सेवा माणून श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेच्‍या माध्‍यमातून स्‍व.डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार फिरते नेत्र चिकित्‍सालयाद्वारे बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील चंद्रपूर तालुक्‍यामध्‍ये गरजू नागरिकांकरिता नेत्र चिकित्‍सा तपासणी शिबिर राबविण्‍यात येत आहे. या शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात गरजू नागरिक घेत आहेत.

==========================

दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी प्राथमिक आरोग्‍य केंद्र दुर्गापूर येथे नेत्र चिकित्‍सा तपासणीकरिता ४०० रुग्‍णांनी सहभाग नोंदविला. यामधील ५० रुग्‍णांना कस्‍तुरबा गांधी रुग्‍णालय सेवाग्राम येथे आज नेण्‍यात आले. सेवाग्राम येथे त्‍यांचेवर मोतीबिंदू शस्‍त्रक्रिया करण्‍यात येईल. उर्वरित रुग्‍णांना दि. ०१ मार्च व १२ मार्च २०२४ रोजी नेण्‍यात येईल व त्‍यांचेवर पुढील उपचार करण्‍यात येतील. दि. १८ फेब्रु. ते दि. २५ फेब्रु. २०२४ दरम्‍यान भटाळी, किटाळी, आगरझरी, अडेगाव, चोरगाव, सिनाळा नविन, चांदसूर्ला, आंबोरा, लोहारा, मामला, चेक निंबाळा, बोर्डा, वलनी, चिचपल्‍ली, जांभार्ला, अजयपूर, नागाळा, मरारसावरी, नंदगुर, पिंपळखुट, हळदी, पेठ, झरी, डोणी येथील नागरिकांकरिता शिबिर आयोजित करण्‍यात आले होते. यामध्‍ये ज्‍या रुग्‍णांना नेत्र विषयक विकार होते. अशा रुग्‍णांना आज प्राथमिक आरोग्‍य केंद्र दुर्गापूर येथे बोलविण्‍यात आले होते. त्‍यापैकीच ५० रुग्‍णांना कस्‍तुरबा गांधी रुग्‍णांलय सेवाग्राम येथे शस्‍त्रक्रियेकरिता नेण्‍यात आले आहे. या शिबिराच्‍या यशस्‍वीतेकरिता कस्‍तुरबा गांधी रुग्‍णालय सेवाग्राम येथील डॉक्‍टरांच्‍या चमुने सहकार्य केले तसेच संस्‍थेचे सचिव राजेश्‍वर सुरावार, शैलेंद्रसिंह बैस व प्रमोद ठाकुर, रामपाल सिंग, विलास टेंभूर्णे, राकेश गौरकार, हनुमान काकडे, श्रीनिवास जंगम, अशोक आलाम, बादल रायपुरे, फारुख  शेख यांनी शिबिराचे आयोजन केले.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here