*आम आदमी प क्षातर्फे शहरात नळबील दहन आंदोलन*

0
11

=============================

     *बल्लारपूर*

=============================

सोमवार दिनांक- 04/03/2024 – शहरातील जनता पाण्याच्या अवाढव्य बील तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मनमानी काराभारामुळे खुपच त्रस्त आहे. असे असताना आम आदमी पक्षातर्फे आज शहरातील सरकारी दवाखान्यासमोर नगरपरिषद चौकात आम आदमी पक्षातर्फे धरना आंदोलन करण्यात आले. व या आंदोलनात मोठ्या संख्येने शहरातील समस्याग्रस्त नागरिक तसेच पक्षाचे जिल्हा व शहर पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन जनतेने आक्रोश व्यक्त केला व अवाढव्य नळ बिलाचे दहन करण्यात आले. यासह शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी पाणी बिलांच्या संदर्भातील समस्या लवकर निकाली लावा. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कार्यपद्धती सुधारा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेणे बंद करा,त्याऐवजी शिक्षित युवकांना रोजगार द्या असे आवाहन केले. जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार यांच्या अध्यक्षतेत एक मागणीपत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले.ज्याचा उत्तर तीन दिवसात मिळाले नाही तर पक्षातर्फे साखळी उपोषण केले जाईल अशी चेतावणी पक्षातर्फे देण्यात आली.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here