*छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील टपाल तिकीटाचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवारी अनावरण*

0
35

==============================

*छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील टपाल तिकीटाचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवारी अनावरण*       ============================

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही होणार प्रकाशन*

==========================

चंद्रपूर, दि.०६- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्या दि.०७ मार्च (गुरुवार) छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण होणार आहे. चंद्रपूरमधील प्रियदर्शनी सभागृहात सकाळी ११.०० वाजता हा कार्यक्रम होईल.

=========================

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष राज्य सरकारच्या वतीने साजरे केले जात आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गुरुवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण केले जाणार आहे. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण होणार आहे. याशिवाय मराठेकालीन टाकसाळी संबंधीची मोडी कागदपत्रे खंड-१, ब्रेल लिपीमध्ये मुद्रित छत्रपती शिवाजी महाराज, ‘महाराष्ट्र – गोंड समुदाय’ हे महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर यांचेही प्रकाशन या सोहळ्यामध्ये होणार आहे. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे भोसले, माँ जिजाऊ यांच्यावर आधारित टपाल तिकिटाचे प्रकाशन झालेले आहे. याशिवाय ना. मुनगंटीवार यांनी अधिवेशनात औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर होण्यासाठी तत्कालीन सरकारसमोर मागणी लावून त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता.आता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाच्या माध्यमातून एक महत्त्वाकांक्षी कार्य पूर्णत्वास येणार असल्य

==============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here