==========================
*चंद्रपूर*
===========================
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करून सौंदर्यीकरण करण्याचा प्रकल्प आता अमृत २.० योजनेंतर्गत राबविला जाणार आहे. यासाठी नगरविकास विभागातर्फे ३० कोटी रुपये मंजूर केले गेले आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे.
या प्रकल्पात मलनिस्सारण प्रकल्प, सौंदर्यीकरण, फाउंटन, रिटेलिंग वॉल, जलीय तण काढणी यंत्रणा यासह इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. चंद्रपूर वासियांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या रामाळा तलावाचे संवर्धन होणार असून यातून शहराच्या पर्यटनात, रोजगार वाढ आणि सौंदर्यात भर पडणार आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले कि, रामाळा तलाव हा चंद्रपूर शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या तलावाकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे तलाव प्रदूषित झाला होता आणि त्याचे सौंदर्य नष्ट होत होते. या तलावाचे संवर्धन करण्यासाठी मी सतत प्रयत्न करत होतो. आता अमृत २.० योजनेंतर्गत यासाठी ३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातून रामाळा तलाव पुन्हा एकदा चंद्रपूर शहराचे सौंदर्य वाढवणारा ठरेल.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,