*३० कोटी रुपयातून ऐतिहासीक रामाळा तलाव होणार पुनरज्जीवित*

0
15

=========================

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश, अमृत 2.0 योजनेंतर्गत निधी मंजूर

=======================

   चंद्रपूरच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक रामाळा तलावाच्या सुंदरतेला प्रदूषणाचे ग्रहण लागले होते. त्यामुळे या तलावाचे संवर्धन करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. याची दखल मुख्यमंत्री यांनी घेतली असून सदर कामाकरिता अमृत 2.0 योजनेअंतर्गत 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता ३० कोटी रुपयातून ऐतिहासीक रामाळा तलाव पुनरज्जीवित होणार आहे.

===========================

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध केल्या जात आहे. नुकतेच आमदार किशोर जोरगेवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते 150  कोटी रुपयांच्या 192 विकासकामांचे भुमिपूजन करण्यात आले आहे. तर मतदार संघाच्या सर्वसमावेशक विकासासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या रामाळा तलावाचे संवर्धन करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी ही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. सदर मागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. नगर विकास विभागाच्या वतीने सदर विकासकामासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करून सौंदर्यीकरण करण्याचा प्रकल्प आता अमृत २.० योजनेंतर्गत राबविला जाणार आहे. या प्रकल्पात मलनिस्सारण प्रकल्प, सौंदर्यीकरण, रिटेलिंग वॉल, संरक्षण भिंत, जलीय तण काढणी यंत्रणा यासह इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे या तलावाचे संवर्धन होणार असून यातून शहराच्या पर्यटनात, रोजगारात वाढ होणार असून सौंदर्यात भर पडणार आहे.
रामाळा तलाव हा चंद्रपूर शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या तलावाकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे तलाव प्रदूषित झाला होता आणि त्याचे सौंदर्य नष्ट होत होते. या तलावाचे संवर्धन करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत होतो. आता अमृत २.० योजनेंतर्गत यासाठी ३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातून रामाळा तलाव पुन्हा एकदा चंद्रपूर शहराचे सौंदर्य वाढवणारा ठरेल असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

 ==========================

रामाळा तलाव संरक्षण समितीने मानले आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार

===========================
रामाळा तलावाच्या संवर्धनासासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल रामाळा तलाव संरक्षण समीतिच्या पदाधिका-यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी भेट घेत त्यांचे आभार मानले आहे.
यावेळी डॉ. सुशील मुंधडा, जुगल सोमानी, सिए. दामोदर सारडा, मनोज जुनोनकर, मुंकुद गांधी, सुधिर बजाज, उमेश चांडक, ओमप्रकाश सारडा, श्याम धोपटे, राजु नागरकर, सोनी, मदन पांडिया, विलास वानखेडे, माखीजा, इंगोले, रमेश बोथरा, श्रीचंद हासानी  आदींची उपस्थिती होती.
यावेळी रामाळा तलाव संरक्षण समितीच्या पदाधिका-यांनी रामाळा तलावाच्या संवर्धनाबाबत आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी चर्चा केली. सदर तलाव हा चंद्रपूरच्या सौंदर्यात भर घालणारा आहे. मात्र अनेक नाल्यांचे पाणी तलावत येत असल्याने तलाव दुषित झाला आहे. यावरही उपाययोजना केल्या जाणार आहे. आपण या तलावाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहात. मंजूर करण्यात आलेल्या 30 कोटी रुपयातून या तलावाला पुनरुज्जीवन मिळणार आहे. असा विश्वासही यावेळी रामाळा तलाव संरक्षण समीतिच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here