Home
Home चंद्रपूर “*आम्ही निर्भय चंद्रपुरकर” या कार्यक्रमाला चंद्रपुरकरांची हजाराेच्या संख्येत उपस्थिती*

“*आम्ही निर्भय चंद्रपुरकर” या कार्यक्रमाला चंद्रपुरकरांची हजाराेच्या संख्येत उपस्थिती*

0
109

===========================

✍️…निलेश ठाकरे 9371321070

==========================

चंद्रपुर – शुक्रवारला दिनांक 14/03/24 राेजी न्यु इंग्लिश विद्यालयाचा मैदानावर झालेल्या “आम्ही निर्भय चंद्रपुरकर” या जन सभेला चंद्रपुरकरांनी हजाराेच्या संख्येत उपस्थितीत राहुन विद्यमान सरकारला येणार्या निवडणुकीत बदलवुन दाखवुन असा या वेळी निच्छय केला. या सभेला चंद्रपुरकरांनी प्रचंड अशी गर्दी केली हाेती. एकीकडे राज्यातले व केंद्रातील नेत्यांचा जनसभेला प्रत्येक कार्यक्रमात चेअर ( कुर्सी ) रिकाम्या असतांना “आम्ही निर्भय चंद्रपुरकर” या कार्यक्रमाला संपुर्ण कुर्च्या भरगच्च भरून दिसत हाेत्या. मैदानावरचा मागे व एका बाजुला प्रेक्षक माेठी गर्दी करत उभ्यांनी सुध्दा या जनसभेला ऐकण्या करिता माेठ्या संख्येत उपस्थित हाेते. अँड.असिम सराेदे आणि मा.डॉ.विशंभर चाेैधरी यांना ऐकण्यास चंद्रपुरकर खुप उत्सुक हाेते. सभेला येण्यापुर्वी या दाेन्ही वक्त्यांनी चंद्रपुर शहर येथिल भ्रमंती करून येथिल बर्याच पैकी समस्या जानुन घेतल्या हाेत्या. त्या नंतर भर उन्हात सायंकाळी 4 वाजेपासुनच मैदानावर प्रेक्षकांची हळु हळु गर्दी वाढायला सुरवात झाली हाेती. सुर्यप्रकाश मावळताच संपुर्ण मैदानावर ठेवलेल्या चेअर (कुर्सी ) नजर पडेल तरी रिकाम्या दिसत नव्हत्या. आपल्या भाषनात दाेन्ही वक्त्यांनी विद्यमान केंद्र व राज्यातल्या सरकारवर राेष व्यक्त करित प्रंतप्रधान नरेंद्र माेदी, अमित शहा, आणि चंद्रपुर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनंगट्टीवार यानी स्वताचा केलेल्या विकास कामाचा भरपुर समाचार घेतला. चंद्रपुर येथे हाेत असलेल्या प्रद्रुषनाबाबत महाराष्ट्र प्रद्रुषन नियंत्रन मडंळाला तर मा.अँड.असिम सराेदे यांनी चांगलेच धारेवर घेतले. त्या करिता कार्यक्रमात मंडळाचा विराेधात उपस्थित असलेल्या वकिलांना पिटीशन दाखल करण्यास त्यांनी विनंती केली. चंद्रपुरात साेहळे, सांसिकृतिक महाेत्सव, उत्सवाचे कार्यक्रम घेवुन केवळ मात्र जनतेच्या पैशाची उधडपट्टी करित स्वताची जाहिरात, प्रसिध्दी करण्यास येथिल पालक मंत्री काम करित असल्याचा टाेला ही यावेळेस अँड.असिम सराेदे यांनी लावला. हा टाेला सत्ताधारी समर्थकांना चांगलाच झाेंबेल हे नक्की. जनतेचे, कामगारांचे शिक्षकांचे,विद्यार्थ्यांचे शेतकर्यांचे,अनेक आंदाेलन दाबण्याचा प्रयत्न राज्यातील अवैध रित्या बसलेली सरकार करित आहे असे ही जनतेला संबाेधित करतांना ते बाेलत हाेते. या वेळेस अश्या हुकुमशाही सरकारला येत्या निवडणुकीत पाडण्यास सज्ज व्हा असा संदेश चंद्रपुरकरांना “निर्भय बनाे” सभेत संदेश देण्यात आला. नरेंद्र माेदींचा एक प्रसंग सांगतांना सराेदे पुढे बाेलतांना सांगत हाेते मा.नरेंद्र माेदींना एका पत्रकारांनी प्रश्न विचारले तुम्हाला काेनता पेपर आवडत नाही तर माेदी साहेबांचे उत्तर बैलेट पेपर आवडत नाही असे हाेते, असे म्हनताच उपस्थित प्रेक्षकांना काही वेळ तर हसुच आवरता आले नाही. म्हनुन या विद्यमान सरकारला ईव्हीएम मशिन हवी असे बाेलताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजरात सराेदे यांना चांगला प्रतीसाद दिला. पालक मंत्री महाेदयांनी घेतलेल्या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी प्रसिध्द गायक, गायीका, कवी, न्युत्यकार, अभिनेते अभिनेत्री यांना बाेलवले हाेते. परंतु “आम्ही निर्भय चंद्रपुरकर” या कार्यक्रमात कुठलाही थाटामाटात प्रचार प्रसार न करता या कार्रक्रमात स्वताहुन चंद्रपुरकरांनी उपस्थिती दर्शवली हाेती. या करिता मा.डॉ.विशंभर चाैधरी यांनी चंद्रपुरकरांचे विशेष आभार मानले. हा कार्यक्रम घेण्यास चंद्रपुर येथिल एनजीओ, सामाजिक संघटना, ईतर राजकिय नेते, पदाधिकारी कार्यक्रते यांनी अथक परिश्रम घेवुन या कार्यक्रमाला यशश्वी करून दाखवले. याचा आनंद असल्याचा सर्व आयाेजकांनी कार्यक्रम स्थळी बाेलुन दाखवले. आता मतदारांनी जागृत हाेवुन मतदान करने गरजे आहे. पक्षाला महत्व न देता काम करणार्या उमेंदवाराला निवडुण देणे गरजेचे आहे. केवळ पाेस्टरबाजी, जाहिरातबाजी करणारे जनप्रतीनीधी निवडुण देवुन जिल्ह्याचा विकास हाेणार नाही असा सुर चंद्रपुरकरात चर्चेत दिसुन येत हाेता.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here