*वरोरा येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन*

0
12

===========================

*वरोरा(वा)* आज दि 16 मार्च शनिवारला युवाशक्ती विचार मंच, वरोरा आणि लोकमान्य महाविद्यालय, वरोरा ( राष्ट्रीय सेवा योजना ) यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून स्वयंस्फूर्त इच्छूक रक्तदात्यांकरिता ही विशेष संधी असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
स्थानिक लोकमान्य महाविद्यालय, वरोरा येथे आज शनिवारला सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत उपरोक्त रक्तदान शिबिर चालणार आहे. दैनंदिन धकाधकीच्या या काळात गरजूंना रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. ही गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने वरोऱ्यातील युवाशक्ती विचार मंचाच्या कार्यकर्त्यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
रक्तदात्यांना आयोजकांकडून सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू प्रदान करण्यात येईल. रक्तदानाचे महत्त्व जाणून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here