*वरोरा येथील शासकीय विश्राम गृह चे  आरक्षण नाकारण्याचे कारण योग्य आहे काय? नागरिकांनी केला सवाल*

0
31

============================

चंद्रपूर(वि.प्र.):21 मार्च रोजीचा वरोरा येथील लायसन्स कॅम्प रद्द करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे देण्यात आली.ही माहिती मिळताच वरोरा येथील शासकीय विश्राम गृह चे  आरक्षण नाकारण्याचे कारण योग्य आहे काय? हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असता हा प्रकार काय याची शहानिशा करण्यात आली असता वरोरा येथील शासकीय विश्राम गृह आरक्षण वेगळ्याच कारणाने नाकारण्यात आल्याचे बोलले जात आहे.

============================

सविस्तर वृत्त असे की 6 मार्च रोजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून रीतसर अर्ज करण्यात आला होता परंतु उपविभागीय अभियंता सा.बां. उपविभाग, वरोरा यांनी जा.क्र.- १८७ / वि. गृह./२०२४ च्या पत्रानुसार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांना Licence कॅम्प (शिबीर) करिता विश्रामगृह वरोरा चे आरक्षण नाकारल्याने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित Licence कॅम्प (शिबीर)रद्द करण्यात आल्याने अनेक जण या शिबिर चा लाभ घेऊ शकणार नाही हे मात्र विशेष!

============================

एक चांगल्या जनहितार्थ शासकीय उपक्रमास विश्रामगृह चे आरक्षण नाकारणे हे कितपत योग्य आहे.कारण की अनेक वेळा चर्चे दरम्यान असे ही कानावर येते की या विश्राम गृहात अनेक वेळा पार्ट्या शार्ट्या होत राहतात. त्याच्या साठी सुद्धा परवानगी आरक्षण संबंधित विभागाकडून दिली जाते काय? या प्रश्नाचा उत्तर अजून ही मिळाला नाही !

===========================

दिनांक 6 मार्च रोजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित विभागाकडे 21मार्च रोजी licence camp(शिबिर)करिता शासकीय विश्राम गृह वरोरा येथे आरक्षण देण्यात यावे असे रीतसर अर्ज करण्यात आले होते परंतु आरक्षण देता येणार नाही असे पत्र देण्यात आले व त्यासाठी वेगळेच कारण संबंधित विभागाने लेखी पत्र द्वारे दिले ते असे की संदर्भ :- आपले कार्यालयीन पत्र क्रं. उप प्रापका /चंद्र./१४०४ दिनांक- ६/३/ २०२४ उपरोक्त विषयांन्वये सविनय सादर करण्यात येते कि, या कार्यालयास शिबीर घेण्याबाबत आपले वरील संदर्भिय पत्र प्राप्त झाले आहे. परंतू सदर निवडणूकीची आचासंहिता लागत असल्यामुळे सदर विश्राम गृह हे आचार संहीता कालावधीत महसुल विभागाचे ताब्यात असते.तसेच या विश्राम गृहात VIP तसेच लोकप्रतिनिधी ताडोबा सफारी करीता तसेच इत्तर महत्वाच्या कामानिमीत्य नेहमी येत असतात.तरी सदर शिबीराचे कालावधीत आपले कडे येणा-या वाहनाची संख्या जास्त होत असल्याने व विश्रामगृहाचा पार्किंग चा परिसर कमी असल्याने वाहन ठेवण्यास जागा अपुरी पडेल. त्यामुळे आपणास आरक्षण देणे शक्य होणार नाही.असे पत्र उप विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वरोरा यांनी दिनांक ०७/०३/२०२४ रोजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना लेखी पत्र दिले.

========================

शासकीय उपक्रम अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमास आचारसंहिता लागू होते काय? व आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हे कारण योग्य व संयुक्तिक आहे का तसेच पत्रा द्वारे दिलेल्या उत्तर प्रमाणेच जर आचारसंहिता ची संभावना असल्याचे नमूद करण्यात आल्यावर VIP व लोकप्रतिनिधीना ताडोबा सफारी साठी कसे काय कोणत्या आधारावर आचारसंहिता सुरू असताना अश्या VIP व लोकप्रतिनिधी ना शासकीय विश्राम गृह येथे आरक्षण देता येतो काय?या प्रश्नाचे उत्तर अजून ही अनुत्तरीत आहे.

===========================

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे  यांना या बाबतीत विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आमच्या या licence camp(शिबिर) उपक्रमासाठी उपविभागीय अभियंता यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे जेव्हा पर्यंत दुसरी जागा उपलब्ध होणार नाही तेव्हापर्यंत आम्हास नाईलाजाने हा licence camp(शिबिर) वरोरा येथे घेता येणार नाही.
अर्थात वरोरा येथील नागरिकांना ह्या सेवेपासून तेव्हापर्यंत मुकावे लागणार आहे.हे ही मात्र तेवढेच खरे!

==========================

वरिष्ठ व संबंधित विभागाने लवकरात लवकर वरोरा येथे या licence camp(शिबिर)साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे तसेच विश्रामगृह आरक्षण शिबिर साठी परवानगी न देण्याचे पत्रातील नमूद कारण योग्य आहे   किंवा नाही याची सखोल चौकशी वरिष्ठांनी करावी.अशी मागणी आता नागरिकात जोर धरू लागली आहे.

============================

कारण की या licence camp(शिबिर) मध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाईन अपॉईंटमेंट नुसार देण्यात येणार होते, परंतु वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात 21 मार्च 2024 रोजी चे लायसन्स कॅम्प आयोजित असलेले शिबिर आता रद्द करण्यात आल्याने वरोरा तालुकावासियांना  सेवेपासुन पुढील आदेशापर्यंत वंचित राहावे लागेल.असे बोलले जात आहे. या शिबिर साठी शासकीय विश्रामगृह उपलब्ध न झाल्याने वरोरा येथे 21 मार्च रोजी होणारा लायसन्स कॅम्प रद्द करण्यात आल्याने नागरिकांनी  त्रिव नाराजी व्यक्त केली आहे.हे मात्र विशेष!

==============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here