भाजपा जनहितासाठी काम करणारा पक्ष : ना.सुधीर मुनगंटीवार गोंडपिपरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

0
46

==========================

गोंडपिपरी, दि. १६ : भाजपा हा जनहितासाठी काम करणारा पक्ष असून काँग्रेस हा केवळ रडणारा पक्ष आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गोंडपिपरी येथे नगरोत्थान अभियानांतर्गत ३ कोटी ३२ लाख रूपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थिताना मुंबईवरून दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते.

=========================
कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,राजुरा विधानसभा प्रभारी देवराव भोंगळे,माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बंडु हजारे, प्रदेश महामंत्री महिला आघाडी अल्काताई आत्राम,भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे,शहर अध्यक्ष चेतनसिंह गौर, महिला शहर अध्यक्षा अरुणा जांभूळकर,ज्येष्ठ नेते सुहास माडुरवार, दीपक सातपुते, अमर बोडलावार, महेंद्रसिंह चंदेल, राकेश पून, प्रशांत येल्लेवार, नगरसेविका मनीषा मडावी, मनीषा दुर्योधन, आश्र्विनी तोडासे, शारदा गरपेल्लीवार,चौधरी गुरुजी आदी उपस्थित होते.
=============================
यावेळी बोलताना ना.श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, गोंडपिपरीच्या जनतेने नेहमी प्रेम दिले आहे. काँग्रेस सत्तेत असताना निधी आणण्यास अपयशी ठरली. मात्र भाजपाने राज्यात सरकार आल्यावर अत्यंत कमी कालावधीत विकासकामांच्या योजना मंजूर करण्यात आल्या. विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भाजपा दूरवरच्या भागातही विकास पोहोचवित आहे.
=============================
राज्य शासनाने महिलांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. बस तिकिटात महिलांना ५० टक्के सवलत राज्यशासनाने दिली आहे. आंगणवाडी सेविकांच्या मानधनातही भरघोस वाढ करण्यात आली आहे. आपण लवकरच गोंडपिपरीच्या जनतेचे दर्शन घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहोत असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
========================
तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध
=========================
यापूर्वी गोंडपिपरीत तालुक्यातील धाबा येथे श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान सभागृह उभारण्यासाठी ९७ लक्ष ८३ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. त्याप्रमाणे गोंडपिपरी शहराच्या विकासाकरिता २० कोटी रुपये देऊन ना. श्री. मुनगंटीवार यांनी वचनपूर्ती केली. आता शहराच्या विकासासाठी एकूण ३ कोटी ३२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावांना आपण गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. गोंडपिपरी तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. ==============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here