*वढा तीर्थक्षेत्राला २५ कोटी चा निधी मंजूर*

0
33

===========================

*पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश*

========================

*वढा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराच्या विकास आराखड्यास २५ कोटीची मान्यता*

==========================

*श्री स्वामी चैतन्य महाराज यांनी मानले सुधीर भाऊंचे आभार* 

========================

  *चंद्रपूर

======================

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस शहरालगत वर्धा पैनगंगा नदीच्या काठी विदर्भाची काशी असलेल्या वढा या तीर्थक्षेत्राच्या विकासकामाकरिता शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विकासपुरुष मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून विदर्भाची पंढरी असलेली चंद्रपूर तालुक्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीर्थक्षेत्र वढा येथील विकास कामाकरीता २५ कोटी रुपयांची विकास आराखड्यास मंजुरी मिळाली असून लवकरच तीर्थक्षेत्रांच्या विकास कामाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे परिसरातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात आनंद पसरलेला असल्याचे चित्र दिसून येते आहे.
सदर ठिकाण हे विदर्भाची काशी म्हणून ओळख आहे त्यामुळे दरवर्षी कार्तिक एकादशीला लाखो भक्तांच्या उपस्थितीत मोठी जत्रा भरते त्याअनुषंगाने परीसरात पुरेशी व्यवस्था नसल्याने तेथे आलेल्या भक्तांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या लक्षात येताच याबाबतीत पाठपुरावा करून तसेच मागील काळातील विधानसभेत वढा परिसराच्या विकासासाठी मुद्दा उपस्थित करून मंजुरी मिळण्याकरिता प्रयत्न केले त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळत नियोजन विभाग, शासन निर्णय दि. ०४/०६/२०१५ अन्वये तीर्थक्षेत्र/पर्यटन स्थळ विकास आराखड्यास मान्यता देण्याकरिता मां. मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या शिखर समितीने चक्राकार पद्धतीने मौजा वढा जि. चंद्रपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील विकास आराखड्याच्या प्रस्तावित रुपये २५ कोटी इतक्या किंमतीच्या विकास आराखड्यास मान्यता दिली.
सदर विकास आराखड्यानुसार या परिसरात मंदिर सभागृह, प्रशासकीय इमारत, पूजा शेड, घाट, छत्री, शौचालय, चेंजिंग रूम, विसर्जन कुंड, याकरिता रुपये १३२९९१३०३/- तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग, बायोडायजेस्टर , फर्निचर याकरिता रुपये २३१७६५०/- तर पाणीपुरवठा व जल निस्सरण , विद्युतीकरण याकरिता रुपये ४,५१,५६,८८१/- तर गेट, आवार भिंत, पार्किंग, पेव्हींग/पाथ वे, आरसीसी रोड, स्लड स्केपिंग/बागकाम, याकरिता १,५३,३०,०००/- तसेच वॉटर मेन स्टोरेज, पंप हाऊस, बोअरवेल, इ. याकरिता रुपये २६,००,००० तसेच आकस्मिकता ४टक्के, जीएसटी १८ टक्के, वास्तू विशारद फी ४ टक्के रुपये ५,१५,८२,९००/- याप्रमाणे २५ कोटी रुपयांची विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
याबद्दल भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष (ग्रा.) श्री. हरीश शर्मा, महानगर जिल्हाध्यक्ष श्री. राहुल पावडे, माजी जिल्हाध्यक्ष श्री. देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री श्री. ब्रिजभुषन पाझारे, श्री स्वामी चैतन्य महाराज, वढा, श्री. संतोष उर्फ बंटीभाऊ भोसकर, माजी सरपंच ग्रा.प. वढा, श्री. संदीप ठाकरे भाजपा अध्यक्ष उसगाव, श्री. समीर भिवापुरे माजी उपसरपंच पांढरकवडा, श्री. विजय आगरे सरपंच धानोरा, श्री. विनोद खेवले उपसरपंच धानोरा, श्री. संजय उकीनकर सरपंच सोनेगाव, श्री. ऋषी कोवे माजी सरपंच नकोडा, श्री. किरण बांदूरकर सरपंच नकोडा, श्री. मंगेश राजगडकर उपसरपंच नकोडा, श्री. बाळकृष्ण झाडे अध्यक्ष नकोडा, श्री. शंकर वरारकर, श्री. प्रभाकर गोहोकर, श्री. बंडू पुरडकर, श्री. विलास पुरडकर, श्री. बाबा चिने, श्री. रमेश नक्षीने, श्री. महेंद्र वरसकर, श्री. विकास हागे, श्रीमती सुलभा सावे, श्रीमती कलावती हागे, श्री. सुरेश वरारकर, श्री. भास्कर वरारकर, श्री. रामदास मोहिजे, श्री. श्रीकांत चौधरी, श्री. कपिल उमरे, सौ. सपना पवार, सौ. सविता मसे, श्री. संकेत मसे, श्री. प्रमोद हागे, सदस्य ग्रा.प. नकोडा श्री. रजत तुरणकर, सौ. तनुश्री बांदुरकर, जसबीर कौर प्लाय, सौ. सुजाता गीद्दे, सौ. हेमा ताला चंदर, सौ. अर्चना पाझारे, श्री. प्रभाकर लिंगमपल्ली, श्री. कम्पा राजय्या, श्री. पंढरी कोवे, श्री. संदू ताला, श्री. चंदर ताला, सौ. सुचिता बोबडे तसेच परिसरातील नागरिकांनी मुख्यमंत्री महोदय तसेच मा. ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार, यांचे मनापासून आभार मानले. ===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here