*बाल संगोपन योजना लाभार्थी यांनी मानले सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे विशेष आभार*

0
38

===========================

*बाल संगोपन योजना
लाभार्थी यांनी मानले सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे विशेष आभार*

==========================

जीवनाच्या वाटचालीत अनेक कठीण प्रसंगाच्या सामना आपणास करावा लागतो आयुष्य एक लढाई समजून येणाऱ्या प्रसंगांना ध्येयाने समोर जावे लागते आयुष्याची लढाई करताना येणाऱ्या अडचणींना संधी समजून त्या संधीच्या सोनं कराल व समाजात वेगळा आदर्श निर्माण करून इतरांनाही सन्मानाने आयुष्य जगण्याकरिता आदर्श बनावे करिता आपले लाडके नेते माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय पालकमंत्री चंद्रपूर वर्धा जिल्हा यांच्या प्रयत्नाने बालसंगोपन शासकीय योजनेअंतर्गत बगड खिडकी येथील शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील लहान बालकांना दर माह 2250 रू एक बालका मागे या योजनेत सहभागी करून लाभ मिळवून देण्यात आला. करिता भारतीय जनता युवा मोर्चा महानगर तर्फे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.1/4/ 2024 ते 30/ 4/ 2024 पर्यंत या कॅम्पचे आयोजन युवा मोर्चा महानगर तर्फे करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजक युवा मोर्चातील सर्व पदाधिकारी व युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर व या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा नेता प्रभाग क्रमांक 11चे माजी नगरसेवक श्री संजय कंचरलावार होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपा ग्रामीण महामंत्री,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष ब्रिजभूषन पाझारे,भाजपा महामंत्री ग्रामीण डॉ.मंगेशजी गुलवाडे,ज्येष्ठ नागरिक समाजसेवक श्री.मैकुजी शेख, गोंडवाना विद्यापीठ येथील सिनेट सदस्य युवा मोर्चा ग्रामीण महामंत्री श्री यश बांगडे, युवा मोर्चा महामंत्री श्री.कृष्णा चंदावार,भाजपा नेता अरविंद कोलनकर, सौ मुग्धा खांडे,यश ठाकरे, जयश्री आत्राम,तृष्णा गेडाम होते या कार्यक्रमात 19 बालकांना लाभार्थी म्हणून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे कुमार गुंजीत जितेंद्र सिंग चव्हाण, रेहान वसीम शेख, आकांक्षा सुरेश बावरे, सुभान पठाण, निदा पठाण ई. बालकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
शुभम खेडकर फरीदा नासिर पठाण असलम शेख रामजीत यादव रजिया शेख खाजा खान पठाण नितेश बनसोड अनुप भाऊ, विकी चांदेकर असलम रज्जाक शेख यांनी कार्यक्रमाचा यशस्वी ते करिता मोलाचे परिश्रम घेतले संचालन शुभम खेडकर यांनी केले व आभार प्रवीण उरकुडे यांनी मानले…..

==≠=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

  1. संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
    उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here