*गडचिरोली*
==========================
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, अधिसभेची (सिनेट) सुरुवात वन्देमात्रम या राष्ट्र गाणाने तसेच विद्यापीठगीत व राज्यगीताने विद्यापीठ अधिसभेच्या (सिनेट) कामकाजाचा प्रारंभ व्हावा. तसेच राष्ट्रगीताने समारोप करावा. या विषयाच्या अनुषंगाने दिनांक १४ मार्च २०२४ रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिसभेत विद्यापीठ विकास मंचाचे व्यवस्थापन परिषद तथा अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावावर चर्चा करून एकमताने सभागृहात मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात अधिसभा (सिनेट) ची सुरुवात वन्देमात्रम या राष्ट्रगाणाने व विद्यापीठ गिताने होते. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या प्रथम अधिसभेचे गठन जानेवारी २०१८ ला झाले तेव्हापासूनच अधिसभेची सुरुवात वन्देमात्रम या राष्ट्रगाणाने व्हायला पाहिजे होते. परतू संविधानिक परंपरांच पालन केल्या गेले नाही. संसद, विधिमंडळाच्या कामकाजाची सुरुवात वन्देमात्रम या राष्ट्रगाणाने होत असतांना, मात्र विद्यापीठात सविधांनिक परंपरांचे पालन केल्या जात नव्हते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या उद्देशिका कलम ४ पोट कलम (४ व १२) नुसार राष्ट्रीय मुल्यांची जोपासना, सांस्कृतीक वारसा जतन करणे .विभिन्न धर्म आणि संस्कृती यांच्या प्रती आदर वृद्धिगंत करणे . हे कायदयानुसार विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्टे आहेत. राष्ट्रगान, राष्ट्रगीत,राज्यगीत व विद्यापीठगीत यांचा सन्मान करुन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगंत होण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या उद्दिष्टांची अमंलबजावणी होणे आवश्यक आहे. असे प्रस्ताव सादर करतांना प्रस्तावक व्यवस्थापन परिषद तथा अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी सभागृहात भुमिका मांडली.
याच अधिसभेत अधिसभा सदस्य यश बांगडे यांनी “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर” साहित्य अध्यासन व अधिसभा सदस्य प्रशांत दोंतुलवार यांनी “युगनायक स्वामी विवेकानंद” अध्यासन केंद्र सुरु करण्याचाही प्रस्ताव सादर केला. सर्व प्रस्ताव चर्चा करुन एकमताने मंजूर करण्यात आले. डॉ. उत्तमचंद कांबळे यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राकरिता स्वतंत्र आणि अद्यावत ग्रंथालय आणि संग्रहालय निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला गुरुदास कामडी यांनी अनुमोदन दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे समाजजीवनातील कार्य अतुलनीय आहे. आज वाचन चळवळ नष्ट होत असतांना आजच्या नव्या पिढीला वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी हे संग्रहालय निश्चितच प्रेरणादायी ठरेल. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक व राष्ट्रीय विचार आज नव्या पिढी समोर ठेवणे आवश्यक आहे. यासाठी अशाप्रकारचे ग्रंथालय व संग्रहालय प्रेरणादायी ठरेल. असे सभागृहात सांगितले.
याच अधिसभेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सन २०२३- २०२४ चे सुधारित अर्थसंकल्प आणि सन २०२४ -२०२५ चा २८.३३ कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा करून मंजूर करण्यात आला. विद्यापीठाचा अर्थ संकल्प विद्यार्थी विकास व विद्यापीठ विकासाला चालना देणारा आहे. आगामी काळात विद्यापीठाला राज्यशासनाकडून मोठया प्रमाणात निधी प्राप्त होऊन प्रशासकीय व भौतिक सुविधांसह गोंडवाना विद्यापीठ गतिमान विद्यापीठ म्हणून समोर येणार आहे. असे गुरुदास कामडी यांनी सांगितले. प्रश्न्नोत्तराचा तासात विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांचे मूल्यमापन आर्दश उत्तरपत्रिका सह करण्यात यावे अशी मागणी गुरुदास कामडी यांनी लावून धरली. यावर विद्यापीठ प्रशासनाने विद्या परिषद व पदवीधर अधिसभा सदस्यांची बैठक आयोजित करून आर्दश उत्तरपत्रिका सह मूल्यमापन करण्यात येईल असे. सागितले.
==========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,