*१७ प्रभागातील ५६ वार्डात यंग चांदा ब्रिगेडच्या वार्ड संघटिकांची नियुक्ती*

0
37

=============================

नवनियुक्त पदाधिकार्यांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या नियुक्ती पत्र

============================

यंग चांदा ब्रिगेड सामाजिक संघटनेचा विस्तार झपाट्याने होत आहे. दरम्यान १७ प्रभागातील ५६ वार्डात वार्ड संघटिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.  यावेळी यंग चांदा ब्र्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, वैशाली मेश्राम, दुर्गा वैरागडे, मंजुषा दरवडे, प्रेमीला बावणे आदींची प्रामूखतेने उपस्थिती होती.

==========================

यंग चांदा ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने चंद्रपूरात अनेक सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहे. संघटनेच्या वतीने कोरोना काळात केलेले कार्य उल्लेखनिय आहे. अनेक गरजु पर्यंत संघटना पोहचण्याचा प्रयत्न करत असुन त्यांना मदत केली जात आहे. निराधार महिलांना शासकिय कागदपत्र तयार करुन देणे, दिव्यांगाना साहित्य वाटप करणे, गरजु विद्यार्थ्यांना शिक्षण उपयोगी साहित्य वाटप करणे असे अनेक उपक्रम संघटणेच्या वतीने राबविल्या जात आहे. याच कार्याला प्रेरित होऊन शेकडो महिला यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश घेत आहेत.
दरम्यान आज ५६  वार्डात वार्ड संघटीकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात  राष्ट्रवादी नगर वंदना पाटील, बालाजी वार्ड मंजुषा दरवडे, तुलसी नगर शालीनी सुरवाडे, नगिनाबाग शालीनी राउत, लालपेठ वंदना कडूकर, रयतवारी सुजाता कापसे, टावर टेकडी कविता वराडकर, भिवापूर माता नगर चौक अर्चना कावळे, समाधी वार्ड शुष्मा तपासे, सावरकर नगर गिरजा वर्मा, प्रकाश नगर काजल देवांगण, बंगाली कॅम्प गीता कोकमवार, स्वावलंबी नगर दिक्षा सातपूते, तुकुम येथील छत्रपती नगर शोभा उराडे, दादमहाल वार्ड आसमा पठाण, विवेक नगर अंजू मैंद, गोपाल नगर पोर्णिमा तोडकर, घुटकाळा वार्ड माधूरी यांच्या सह अनेक महिलांची वार्ड संघटिका म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आपण या संघटनेचे पदाधिकारी झाल्या आहात. आता आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्या वार्डातील गरजु पर्यंत पोहचून त्यांना शक्य ती मदत आपल्या माध्यमातून झाली पाहिजे. नागरिकांच्या समस्या आपल्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहचल्या पाहिजे. यंग चांदा ब्रिगेड ही संस्था सेवेचे केंद्र आहे. या संघटनेशी आपण जुळल्याने संघटना आणखी वेगाने सामाजिक कार्यात अग्रेसेन होणार असा विश्वास यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला असुन सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here