*गावठी दारू विरोधात वरोरा उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई*

0
32

===========================

  *वरोरा*

============================

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतूक यावर सक्त कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक १९/०३/२०२४ रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभाग वरोरा व त्यांच्या पथकाने बरांज तांडा भद्रावती येथील जंगलात ओढ्‌याच्या काठी सुरु असलेल्या गावठी दारू अवैधरीत्या गाळण्याच्या भट्टीवर धडक कारवाई करून सदरची अवैध हातभट्टी उध्वस्त केली. सदर कारवाईत ४०० लिटर सडवा व ५० लिटर तयार दारू व इतर साहित्य नष्ट करण्यात आले. तसेच बरांज तांडा ते भद्रावती रोडवर मनोरा गावाजवळ दुचाकी वाहनावरून अवैध गावठी दारूची वाहतूक करतांना नामे राजेश फुल्लू माडोत या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३० लिटर गावठी दारू व ज्युपिटर कंपनीची दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. वरील दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमालाची किंमत रुपये ६९,८००/- एवढी आहे.

==========================

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारे अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूक आढळून आल्यास त्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या कार्यालायचे कार्यक्षेत्रात रात्रीची गस्त घालून अशा प्रकारचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस
वरील कारवाई ही या विभागाचे अधीक्षक श्री. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विकास बी, थोरात, निरीक्षक, रा. उ. शु., वरोरा, श्री. सचिन एच. पोलेवार, दु. निरीक्षक, श्री. प्रमोद राजोते, दु. निरीक्षक, श्री.जगदीश मस्के, जवान, श्री. जितेंद्र आनंद, जवान, श्री. अमोल भोयर, जवान व श्री. विलास महाकुलकर, जवान-. नि-वाहनचालक यांनी पार पाडली.आहेत.

============================

सदरील गुन्ह्याचा पुढील तपास श्री. विकास बी. थोरात, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा हे करीत

=============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here