*रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटनेच्या वतीने बाईक रैली,जल पूजन आणि मानवी श्रृंखला करुन जल दिवस* *आयोजित*

0
17

             *चंद्रपूर* 

==========================

चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाला तलावाचे संरक्षण करण्यासाठी स्थापित झालेल्या रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटनेच्या वतीने जागतिक जल दिनाचे आयोजन शुक्रवार दि 22 मार्च 2024 रोजी उत्साहात करण्यात आले। सकाली 10 वाजता गांधी चौक येथुन रामाला तलाव पर्यंत बाईक रैली काढण्यात आली। तलावात जल पूजन करण्यात आले। तलावाच्या काठावर मानव श्रृंखला करुन,वाचवा – वाचवा रामाला तलाव वाचवा, जल है तो कल है, आदि घोषणा देण्यात आल्या।
या प्रसंगी संयोजक मनोज जुनोनकर म्हणाले रामाला तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि प्रदुषण होत आहे। तलाव दिवसें – दिवस नष्ट होत आहे। या तलावाने शहरातील भूगर्भा चा जलस्तर ठीक आहे। जलस्त्रोतांचे संरक्षण करण्याची जवाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे। जिल्हाधिकारी महोदयांनी रामाला तलाव वाचविण्यासाठी तातडी ने उपाय योजना करणे आवश्यक आहे।
संयोजक प्रा डा जुगलकिशोर सोमाणी म्हणाले चंद्रपूर शहरात पूर्वी एकुण सहा तलाव होते। पांच तलावात लोकांनी अतिक्रमण करून नष्ट केले। रामाला तलावात ही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे। तलावात होणारे अतिक्रमण शासनाने थांबविणे आवश्यक आहे।
झरपट, इरई नदी स्वच्छता अभियानाचे प्रवर्तक संयोजक मुरलीमनोहर व्यास यांनी जागतिक जल दिवसाची माहिती देतांना सांगीतले कि, पृथ्वी वर सत्तर टक्के पाणी आहे त्या पैकी फक्त दोन टक्के पाणी पिण्यास योग्य आहे। त्याच्यातही प्रदुषण होत आहे। ही समस्या जागतीक समस्या झालेली आहे। पाण्याचे संरक्षण करण्याची जवाबदारी प्रत्येक मानवाची आहे । जन जागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणे ने 1993 साला पासुन जागतीक जल दिवस 22 मार्च रोजी सर्व देशांमध्ये आयोजित करण्यात येतो।
जल जीवनदाता आहे। भारतीय संस्कृतित भगवान वरुण जल देवता आहे।अनेक प्रसंगी जल पूजन करतो। आज जल पूजन करून प्रार्थना करुया जगात कुठेही पाण्याचे दुर्भिक्ष्य होऊ नये।
रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटनेच्या वतीने आयोजित या जल दिवस कार्यक्रम प्रसंगी संयोजक मनोज जुनोनकर,प्रा डा जुगलकिशोर सोमाणी, मुरलीमनोहर व्यास, दिनेश बजाज , मदनगोपाल पांडीया, चुडामण पिपरिकर , मुकुंद गांधी, सुधिर बजाज,प्रा डा शैलेंद्र शुक्ला,गोपाल मुंदडा,सौ राधिका मुंदडा,सौ लता सोमाणी, सौ प्रमिला बजाज,राजकुमार माखीजा, विलास वानखेडे, डा स्वपनकुमार दास, दीपक व्यास,किशोर बंडावार, सौ मीना बंडावार, रामानंद राठी,गौरिशंकर मंत्री, रमेशचंद्र बोथरा,दामोदर सारडा,पुनमचंद तिवारी,हरिभाऊ नागापूरे , श्यामलाल बजाज,हनुमान बजाज, बबलू सोमाणी, किशोर फुलसंगे, महावीर मंत्री , अरविंद सोनी,आकाश बोथरा,सौ लता माहेश्वरी, भरत बजाज, मुन्ना शर्मा,सौ उमा चौहान,अर्जुन राठी,अशोक वर्मा,रमेश मुंदडा,अशोक कर्वा, संदिप माहेश्वरी,प्रशांत बैद,सुरेश राठी,दीपक सोमाणी,नारायण तोष्णिवाल,ओमप्रकाश राठी, बृजकिशोर मंत्री, बृजगोपाल तोष्णिवाल, हेमंत चांडक, सत्यनारायण व्यास,नारायण सारडा, पं जगदिश व्यास, एड. रायपुरे, नंदकिशोर तोष्णिवाल,प्रभाकर मंत्री रवि लोणकर, श्रीमती किशोरी हिरुडकर, पूनम पीसे, छाया हिरोडे, संतोष पिंपलकर, अनुप त्रिकोलानी, विशाल गुप्ताआदि अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते।

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here