*कृषी संशोधन केंद्र, एकार्जुना येथे भव्य कापूस उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजन*

0
10

*वरोरा दि 29 मार्च*

              कृषी संशोधन केंद्र, एकार्जुना (डॉ. पंदेकृवि, अकोला) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्रीज, कॉटन डेव्हलपमेंट अँड रिसर्च असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “पिडीकेव्ही-इंडो काउंट सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर कॉटन” या प्रकल्पा अंतर्गत भव्य कापूस उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजन शनिवारी सकाळी १०.०० वाजता कृषी संशोधन केंद्र, एकार्जुना येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन  शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर यांचे हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत मोहता, कमिटी चेअरमेन सिटी सीडीआरए मॅनेजिंग डायरेक्टर, गिमाटेक्स, हिंगणघाट,  कैलाश , लालपुरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, इंडो काऊंट इंड. ली मुंबई व  प्रियबाता मोंडल, जनरल मॅनेजर, वॅकर मेट्रोआर्क केमिकल, प्रा. लि. लाभणार आहेत. विशेष अतिथी म्हणून  प्रभाकर शिवणकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी वर्धा, डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, यवतमाळ श्री प्रमोद लव्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. मनीकंदण, वरिष्ठ शास्त्रज्ञ सीआयसीआर, नागपूर, डॉ. के पंडियन, वरिष्ठ शास्त्रज्ञ सीरकॉट नागपूर, डॉ आशीतोष लाटकर, कृषि विद्या विभाग यवतमाळ,  सुशांत लौटे, उपविभागीय कृषि अधिकारी वरोरा,  प्रशांत टेकाडे, मॅनेजर सस्टेनेबल कॉटन, इंडो काऊंट इंड.ली, डॉ. एस बि अमरशेट्टीवार, प्रमुख, कृषि संशोधन केंद्र एकार्जुना व  गोविंद वैराळे, प्रकल्प समन्वयक, सिटी सीडीआरए लाभणार आहेत. असे या कार्यक्रमाचे आयोजक  जगदीश नेरलवार, प्रकल्प अधिकारी, सिटी सीडीआरए व डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार, प्रभारी अधिकारी तथा प्रकल्प प्रमुख, कृषि संशोधन केंद्र, एकार्जुना यांनी जास्तीत जास्त शेतकर्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

 चंदन देवांगन चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here