*कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वरोरा पोलीसांचे वरिष्ठ अधिकारयांच्या उपस्थितीत शहरात रूट मार्च*

0
53

=========================

 *वरोरा*  

=========================

पोलीस स्टेशन वरोरा अंतर्गत आज दि.०२/०४/२०२४ रोजी मा. रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा. नयोमी साटम, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे उपस्थितीत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ प्रक्रिया तसेच रमजान ईद, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सण उत्सवानिमीत्य कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन लोकसभा निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडावी याकरीता पोलीस स्टेशन वरोरा येथे रूट मार्च काढण्यात आला असुन सदर रूट मार्च वरोरा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पदमावार चौक ते नेहरू चौक ते कामगार चौक ते मित्र चौक ते डोगरवार चौक ते नेहरू चौक ते कामगार चौक ते विर सावरकर चौक ते महात्मा ज्योतीबा फुले चौक ते परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गाने सदर रूट मार्च काढण्यात आला. सदर रूट मार्च करीता पोलीस स्टेशन वरोरा, भद्रावती, माजरी येथील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार तसेच सि.६० पथक, आर.सी.पी पथक, सी आय एस एफ. पथक सहभागी झाले.

========================

सदरचे रूट मार्च हे मा. रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा. नयोमी साटम, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे उपस्थितीत घेण्यात आला.

======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here