*घाटंजी येथे वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन*

0
11

=========================

         *चंद्रपूर*

==============================

                      चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे वंचित हुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या घाटंजी येथील पहिल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. यावेळी बेले यांनी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून भव्य रॅलीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला.

========================

रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आणि बेले यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला.  बेले यांनी रॅलीमध्ये बोलताना सांगितले की, ते निवडून आल्यास वंचित आणि गरीब घटकांच्या हिताचे काम करतील.
त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याचे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याचे वचन दिले.
या कार्यक्रमामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

==========================

राजेश बेले यांच्या या रॅलीमुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणनीती आता रंगत आली आहे. घाटंजी, मुकुटबन, पांढरकवडा आणि वणी या भागामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांप्रती नागरिकांमध्ये अत्यंत उत्साह पसरला असून, प्रचंड बहुमताने विजय करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

====≠=====================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here