इंडिया बुकमध्ये नोंद झालेल्या 19 महिण्याच्या सुरवीची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भेट

0
24

=========================

   वयाच्या अवघ्या 19 व्या महिन्यात विविध 98 वस्तु ओळखणा-या घुग्घुस येथील सुरवी समिंद्र साळवे हिचे इंडिया बुकमध्ये नोंद झाली आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस येथील तिच्या राहत्या जात तिची भेट घेत अभिनंदन केले आहे.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे घुग्घूसचे नेते इमरान खानप्रेम गंगाधरेडॉ. गौतममयुर केवलेराजू नाथरमंगेश भोयरदेविदास अमृतकरआशिष वाघमारेसमींद्र साळवेपुजा साळवेअर्चना साळवेउमा महल्लेअंजु ठोंबरेशशिकला वाघमारेदिपा वाघमारेस्मिता यदुवंशीप्रिया गौरकारआशा टोंगेसंध्या कन्नूरअंनु सिंगकिरण मदनकरस्नेहा जेऊरकरलिखिता ठोंबरेसंजय महल्ले आदींची उपस्थिती होती.
    घुग्घुस मधील राम नगर या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या अवघ्या एकोणीस महिन्यांच्या सुरवी या चिमुकलीने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर इतिहास घडवला आहे. फक्त १९ महिन्यांची सुरवी या वयात तब्बल ९८ वस्तू ओळखत असून तिच्या या तल्लख बुद्धीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ ने घेतली आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी सुरवीच्या घरी तिची भेट घेत अभिनंदन केले आहे. यावेळी सुरवीन चित्रातील अनेक वस्तूपक्षी ओळखून दाखविले.
      या लहान वयात आपल्या मुलीवर चांगले संस्कार करणारे आणि तिच्या ठायी असणारी बुद्धिमत्ता ओळखणारे पालकही कौतुकास पात्र आहेत. तिचे हे यश नक्कीच अभिमानास्पद असून या चिमुकलीने भविष्यात आपल्या चंद्रपूरचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य उज्ज्वल करावेअशी आशा यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. यावेळी स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, 

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here