*खेडुले कुणबी समाज मंडळाचा ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयाचा संकल्प*

0
27

=============================        चंद्रपूर, दि. १६ एप्रिल २०२४ : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीमध्ये खेडुले कुणबी समाज मंडळ चंद्रपूर जिल्हा यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. ============================               चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा कायापालट व्हावा, मतदार क्षेत्रातील प्रश्न मार्गी लागावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटना स्वयंस्फूर्तीने ना. मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा आणि समर्थन देत आहेत. सर्वसामावेशक नेता म्हणून सुधीरभाऊंची ओळख आहे. त्यांना एकदा भेटले की काम होतेच, असा विश्वास निर्माण झाल्यामुळे हा लोकनेता या क्षेत्रातून विक्रमी मतांनी विजयी व्हावा, असा संकल्प देखील समाजाद्वारे करण्यात आला आहे. नुकतेच खेडुले कुणबी समाजाच्या शिष्टमंडळाने ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच त्यांना सर्वाधिक मतांनी निवडून देण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेऊ, असा विश्वास व्यक्त केला. ===========================               कुणबी समाज मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष पुरुषोत्तम सहारे, उपाध्यक्ष देवराव माकडे, सचिव गुलाब मातेरे, डॉ. यशवंत सहारे, अशोक शेंडे, विठ्ठल देशमुख, सुधीर नाकाडे, रमेश गद्रे, ॲड. नितीन तोंडरे, चंद्रकांत शेंडे, बक्षीजी ठाकरे यांच्यासह खेडुले समाज मंडळाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत जाहीर पाठींबा दिल्याबद्दल ना. मुनगंटीवार यांनी खेडुले कुणबी समाजबांधवांचे आभार मानले आहे. =============================           *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===========================               संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356, उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here