*रिचार्ज मीटर रद्द करा, उलगुलान संघटनेचे तहसीलदारांना निवेदन*

0
16

================================

महाराष्ट्र शासनाने सध्या घरोघरी रिचार्ज मीटर लावण्याची सुरुवात केली असून वीज ग्राहकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.तसेच समोरही त्रास सहन करावा लागणार असून रिचार्ज मीटर तात्काळ रद्द करा अशी मागणी उलगुलान संघटनेने केली आहे.तसे निवेदन राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे. =============================             जुन्या वीज मीटर मुळे नागरिकांना थकीत वीज बिल भरण्यासाठी मुभा मिळत होती.मात्र आता रिचार्ज मीटर मुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार असून रिचार्ज न केल्यास वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.तसेच गोरगरीब जनतेवर आर्थिक भुर्दंड बसणार आहे.त्यामुळं रिचार्ज मीटर तात्काळ रद्द करून जुने वीज मीटर पूर्ववत सुरू करावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.तसे निवेदन बल्लारपूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी , दिपक कडेल, संजय गिदवानी, संपत कोरडे, केशव शिपूंळकर, मोहम्मद खान पठान,प्रविण पोहणकर, रितिक वांढरे, सुजल वानखेडे आदींची उपस्थिती होती. ================================      *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==≠============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here