*कृषि उत्पन्न बाजार समिति वरोरा येथे शनिवारी दुपारी 12 वाजता भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित*

0
21

========================== 

*वरोरा* 

============================

कृषि उत्पन्न बाजार समिती वरोरा अंतर्गत राजीव गांधी मार्केट यार्ड वरोरा येथे दि. १५/०६/२०२४ रोज शनिवारला दु. १२.०० वाजता बाजार समिती वरोरा तर्फे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.  ==============================         सदरील मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना पारंपारिक व नविन पिके आधुनिक पध्दतीने घेणे, शासनाच्या विविध योजनांची व शेतीपुरक उद्योग व्यवसायासंबंधी जिल्हा कृषि अधिकारी चंद्रपूर शंकररावजी तोटावार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर प्रशांत धोटे, प्राचार्य आनंद निकेतन कृषि महाविद्यालय आनंदवन वरोरा सुहास सु. पोतदार, कृषि संशोधन केंद्र वरोरा श्रीकांत अमरशेट्टीवार, तालुका कृषि अधिकारी वरोरा एस.बी. लव्हाटे, कृषि अधिकारी तालुका कृषि कार्यालय वरोरा मारोतराव वरभे, कृषि अधिकारी पंचायत समिती वरोरा गजानन हटवार इत्यादी मार्गदर्शक मार्गदर्शन करणार असून त्याव्दारे शेतकरी बांधवांचे उत्पन्नामध्ये वाढ होवू शकते. ===========================            त्याकरीता राजीव गांधी मार्केट यार्ड मोहबाळा रोड वरोरा येथे दि. १५/०६/२०२४ रोज शनिवारला दु. १२.०० वाजता होणाऱ्या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यास शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सदरील मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समित्तीचे मा. सभापती विजय रा. देवतळे, उपसभापती जयंत मो. टेमूर्डे व सचिव चंद्रसेन सा. शिंदे यांनी केलेले आहे. ============================               *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here