*बल्लारपूर शहराच्या गोल पुलियामधील सांडपाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करू, युवक काँग्रेसचा इशारा*

0
19

==============================

बल्लारपूर शहरातील अति महत्वाचा भाग म्हणून ओळख असलेल्या गोल पुलियामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचून राहत असून त्यामुळं सर्वसामान्य नागरिक,वयोवृद्ध, विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळं गोल पुलिया मधील सांडपाण्याचा कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी युवक काँग्रेसने केली असून 21 तारखेला रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.तसे निवेदन रेल्वे विभागाला देण्यात आले आहे. ===≠===========================    बल्लारपूर शहरातून गोल पुलिया मधून रहदारी मोठ्या प्रमाणात सुरू असते.अशातच त्या ठिकाणी सांडपाणी साचून राहत असते.तर दुसरीकडे पावसाळा सुरू झाला असून पावसाचे पाणी सुद्धा साचून राहत असून सर्वसामान्य नागरिकांना राहदरीसाठी अडचण निर्माण होत आहे.तर पावसाचे पाणी साचून राहत असल्याने हा मार्ग बंद असते.त्यामुळं रेल्वे प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा व नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा 21 तारखेला रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे. यावेळी राजु झोडे, चेतन गेडाम, छोटू सिद्दीक़ी, संजय सुर्यवंशी,श्यामभाऊ झिलपे,प्रदीप गौरशेट्टीवार,अरविंद वर्मा,गोपाल कलवला,सचिन गोंधळी, आदिल भोयर,मंगेश जुगरे, नन्हा लाहोरे, बँटी पुनाला आदि लोकांनी निवेदन दिल ===============================        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here