*बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम तात्काळ पुर्ण करा.- खा. प्रतिभा धानोरकर अन्यथा उग्र आंदोलन छेडणार, धानोरकरांचा अधिकाऱ्यांना ईशारा*

0
18

============================= 

  *चंद्रपूर* 

===============================

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा ईशारा खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. बाबुपेठ उड्डाण पुलाच्या संदर्भाने आज खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांसह या प्रलंबित उड्डाण पुलाला भेट दिली.
खासदार धानोरकर यांनी जनसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठकांचे सत्र सुरु केले असून आज 20 जुन रोजी दु. 04.00 वा. निर्माणाधिन असलेल्या व ८ वर्षांपासून रखडलेल्या बाबुपेठ उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत उड्डाण पुल जनतेच्या सेवेत सुरु न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा ईशारा उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. सदर पुलाचे काम अनेक वर्षापासून सुरु असून या पुलाच्या अभावी अनेक नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलाची प्रतिक्षा समग्र बाबुपेठ वासीयांना असून अधिकारी मात्र या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यासंदर्भात खासदार धानोरकर यांच्या कडे तक्रारी प्राप्त झाल्या नंतर खासदार धानोरकर यांनी तातडीने पाहणी करुन उर्वरीत कामाचा आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता श्री. टांगले, महिला कॉग्रेस च्या शहर अध्यक्ष चंदाताई वैरागडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक संतोष लहामगे, माजी नगर सेवक पितांबर कश्यप, सोहेल रजा, प्रशांत भारती यांसह बाबुपेठ मधील अनेक नागरीकांची उपस्थिती होती. ==============================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here