ताडाळी येथे मुक्त संचार करत असलेल्या वाघाला जेरबंद करा – आ. किशोर जोरगेवार मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांना सूचना

0
10

==============================

ताडाळी येथे मुक्त संचार करत असलेल्या वाघाला जेरबंद करा – आ. किशोर जोरगेवार

मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांना सूचना

==================================

मागील काही दिवसांपासून ताडाळी परिसरात वाघाचा मुक्त संचार असून येथील पाळीव जनावरांना वाघाने ठार केले आहे. परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे सदर वाघाला तत्काळ जेरबंद कराअशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर वनवृत्त क्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांना केल्या आहेत. 

==============================

ताडाळी येथील नागरिकांना मागील काही दिवसांपासून वाघाचे दर्शन होत आहे. त्यातच काल वाघाने ताडाळी आणि चारगाव शिवारात म्हैसवर हल्ला करून ठार केले. तर आज ताडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी गावात वासरू व बकरीवर हल्ला करून ठार केल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे. 

===============================

सध्या शेतीचे हंगाम सुरू असल्याने शेतकरी शेतीविषयक काम करण्याकरिता शेतात जातात. त्यामुळे सदर परिसरात मानव आणि वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता कोणतीही मानवी जीवितहानी होण्याआधी सदर वाघाला जेरबंद करण्याकरिता वन विभागाची चमू पाठवून वाघाला जेरबंद करावेअशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. सदर मागणीचे पत्रही त्यांच्या वतीने मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांना पाठविण्यात आले आहे. ============================               *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here