*खातेदाराच्या वारसदारांना बँक ऑफ महाराष्ट्र कडून रू. ४० लाखांचा अपघात विमा लाभ वरोरा*

0
43

============================

विद्यानिकेतन हायस्कूल दादावाडीवडगाव चंद्रपूर येथील स्कूल बस चालक कर्मचारी स्व. मनोहर विक्रम वाणी यांचा 20 नोव्हेंबर 2023 ला जूनोना जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.

============================

स्व. मनोहर विक्रम वाणी यांचे वेतन खाते, बॅंक ऑफ महाराष्ट्र, शाखा वडगाव, नागपूर रोड चंद्रपूर इथे असून ते सन 2003 पासून या बँकेचे वेतन खातेदार होते.

============================

बँक ऑफ महाराष्ट्र च्या नियमानुसार वेतन खातेदाराच्या खात्याला अपघात विमा योजना संलग्न आहे. या नियमानुसार, मयत खातेदाराच्या वारसदारांना विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडगाव चे शाखा प्रबंधक सागर खापने यांनी मयत खातेदाराच्या मृत्यू संबंधित सर्व दस्तऐवज, चंद्रपूर अंचल प्रबंधक प्रमोद साबळे यांचे यांचे मार्गदर्शनात , बॅंक ऑफ महाराष्ट्र चे प्रधान कार्यालय पूणे ईथे सादर केले होते. या प्रकरणात सतत पाठपुरावा करून, मयत खातेदार स्व. मनोहर विक्रम वाणी यांच्या पत्नी उज्वला मनोहर वाणी यांच्या खात्यात रूपये ४० लाखांचा धनादेश, विमा योजना संरक्षण लाभ म्हणून जमा करून, आर्थिक लाभ मिळवून दिला.

===============================

बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापन यांनी सामाजिक बांधीलकीला जागृत राहून, मयत वेतन खातेदाराच्या वारसदारांना आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल, मयत खातेदाराच्या पत्नी, कुटूंबातील सर्व घटक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी चंद्रपूर अंचल प्रबंधक प्रमोद साबळे साहेब आणि शाखा प्रबंधक सागर खापने आणि कर्मचारी वृंद यांचे विशेष आभार मानले.

=============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

==============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here