मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळवून देण्यासाठी यंत्रणा गतिशील करा – आ. किशोर जोरगेवार

0
12

=============================

नागरिकांच्या विविध समस्यांना घेऊन महानगरपालिका प्रशासन सह बैठकविविध सूचना

=================================

  राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची महानगरपालिका क्षेत्रात उत्तमरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा गतिशील कार्यान्वित करत प्रत्येक पात्र महिलेला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कराअशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिका प्रशासनाला  केल्या आहेत. ===============================          आज सोमवारी चंद्रपूर महानगरपालिकेत आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक बोलावली होती. सदर बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली असून अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. या बैठकीला मनपा अतिरिक्त आयुक्त चंदन पाटीलउपायुक्त रविंद्र भेलावेसहाय्य आयुक्त सचिन माकोडेनरेंद्र बोबाटेअमुल भुतेअमोल शडकेअमित घुलेशहर अभियंता विजय बोरिकररविंद्र हजारेडाॅ. नयना उत्तरवारराहुल पंचबुध्देरविंद्र कांबळेरफिक शेखसारिखा शिरभातेराहुल भोयरआशिष भारती यांच्यासह माता महाकाली महोत्सव समितीच सचिव अजय जयस्वालमहिला शहर प्रमुख वंदना हातगावकरआदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथेसविता दंडारेसायली येरणेअल्पसंख्याक शहर प्रमुख सलिम शेखअल्पसंख्यांक युथ शहर प्रमुख राशेद हुसेनयुवती प्रमुख भाग्यश्री हांडेअल्पसंख्याक महिला शहर प्रमूख कौसर खानविमल कातकरकल्पना शिंदेअल्का मेश्रामकविता निखाडेअस्मिता दोनाडकरशहर संघटक करणसिंग बैसप्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, हरमन जोसेफमंगेश अहिरकरमुकेश गाडगेराम जंगमविनोद अनंतवार आदींची उपस्थिती होती. अनेक अधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. ===============================       मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत महिलांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करामनपाद्वारे सुरु करण्यात आलेल्या पाच केंद्रांबाबत जनजागृती कराकेंद्रावर येणाऱ्या महिलांची गैरसोय होणार नाहीया दृष्टिकोनातून या केंद्रांवर उपाययोजना करत अर्ज स्वीकारण्याची गती वाढवाअशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहेत. अमृत 2.0 अंतर्गत प्रस्तावित कामे जलद गतीने करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. केरला कॉलनी येथील नाल्यामुळे या परिसरात पुरपरिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे सदर नाल्याची स्वच्छता करण्यात यावीअशा सूचनाही सदर बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. अमृत योजनेचे नळाचे देयके चुकीच्या पद्धतीने देण्यात आले आहेत. याची चौकशी करून देयके वसुलीची सक्ती करू नयेअशा सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांना केल्या आहेत. जन्म दाखल्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कर अदा केले असल्यास दाखला दिला जाईलअसा प्रकार सुरु आहे. हे योग्य नाही. दाखल्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना तात्काळ दाखला उपलब्ध करून देण्यात यावाअसे निर्देशही आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. ==============================   पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्या. अनेक भागात नियमित स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. मनपाच्या शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी योजनाबद्ध दृष्टिकोनातून सर्व विभागाशी समन्वय ठेवून काम कराअसे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. ===============================              या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाविषयी विशेष चर्चा केली. कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा मिळण्यासाठी जलव्यवस्थापनाच्या उपाययोजना करण्याची गरज आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केली. शहरातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी महानगरपालिकेने विशेष उपाययोजना कराव्यात. शहराच्या विकास प्रक्रियेत स्थानिक नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. महानगरपालिकेने जनतेच्या समस्या आणि सूचना विचारात घ्याव्यातअसेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. यावेळी नागरिकांनी अनेक तक्रारी दिल्या. सदर तक्रारींची तत्काळ दखल घेण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. सदर बैठकीला शहरातील नागरिकांची उपस्थिती होती. =============================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================          कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे 

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here