सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी कुटुंबातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बदल करा – आ. किशोर जोरगेवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली मागणी

0
21

*चंद्रपूर*

सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी कुटुंबातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बदल करा – आ. किशोर जोरगेवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली मागणी

चंद्रपूर:  सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी कुटुंबातील महिलांचे जीवन अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बदल करून शासकीय कर्मचार्यांचे सेवा निवृत्ती वेतन २ लाख ५० हजार पेक्षा कमी असलेल्या महिलांना सदर योजनेत पात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेत केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्रातील गरजू महिलांसाठी एक उत्तम आर्थिक आधार योजना आहे. परंतु, सध्याच्या पात्रता निकषांमुळे काही महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. विशेषतः, ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार येथे किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत, त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

अनेक सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन अत्यल्प असून त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लक्ष रुपये पेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत, अशा महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ अधिकाधिक गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी, पात्रता निकषांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ज्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी कुटुंबातील सदस्यांचे वार्षिक सेवानिवृत्ती वेतन आणि वार्षिक उत्पन्न २,५०,००० रुपये पेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी पात्र करून घेण्यासाठी निकषांमध्ये आवश्यक बदल करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी निवेदनाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. यावेळी सदर मागणी बाबत सकारात्मक चर्चा झाली असून यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे.

   कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here