================================= *कारगिल विजय दिवस समारोह* ================================ *माजी सैनिक कल्याण बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर तर्फे *२५वा कारगिल विजय दिवस समारोह व माजी सैनिक मेळावा* =============================== दि. २६ जुलै २०१४ रोजी कुणबी समाज मंदिर, लक्ष्मीनगर, वडगाव चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात मा. श्री. श्रीकांत देशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या. श्री. शुभम दांडेकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रपूर यांनी दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. शौर्य पदक विजेते, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, वयोवृद्ध माजी सैनिक, माजी सैनिक महिला बचत गटाच्या सदस्या, शाळेतील विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चंद्रपूर ते कारगिल – लेह-लदाख मोटारसायकलने प्रवास करून आलेल्या श्री. संकेत काळे व श्री. अश्विन करमरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा पण सत्कार करण्यात आला. =============================== कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री. शुभम दांडेकर, जि. सै. क. अधिकारी, चंद्रपूर यांनी केले तर कार्यक्रमाची रुपरेषा श्री. हरीश गाडे, अध्यक्ष, मा. सै. क. बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांनी केले. कार्यक्रमात उपस्थितांना, मा. श्री. सुधाकर पोपटराव यादव, डी. वाय. एस. पी. यांनी कारगिल विजय दिवसाचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात मा. श्री. श्रीकांत देशपांडे अप्पर जिल्हाधिकारी यांनी कारगिल युद्धाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला उपस्थित माजी सैनिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला मा. ॲड. श्री. पुरुषोत्तम सातपुते यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्री. अजीतराम डायरेक्टर, भूतपूर्व सैनिक कॅंटिन सेवा, यांनी कॅंटिनबद्दल माहिती दिली. =============================== कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांना, श्री. किरण कमलाकर देशमुख, सदस्य, मा. सै. क. बहुउद्देशीय संस्था यांनी , सैन्याच्या तिनही दलात ( स्थळ सेना, वायूसेना, नौसेना)अधिकारी पदावर भरतीसाठी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन श्री. राजेंद्र भोयर, सहसचिव, मा. सै. क. बहुउद्देशीय संस्था यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. शेंडे, आकाशवाणी चंद्रपूर यांनी केले. मंचावर मा. श्री. श्रीकांत देशपांडे अप्पर जिल्हाधिकारी, मा. श्री. सुधाकर पोपटराव यादव डी. वाय. एस पी. , मा. श्री. शुभम दांडेकर, जि. सै. क. अधिकारी, मा. ॲड. श्री. पुरुषोत्तम सातपुते, श्री. मंगरे (मा.सै.) शौर्य पदक विजेते, सुभेदार (निवृत्त) श्री. श्याम तिरसुडे, वि.से.मे. (VSM) , उपस्थित होते. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,