*भर पावसात तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली पूरबाधित शेतीची पाहणी*

0
37

==============================                     *गडचिरोली*                                                          ============================= गडचिरोली,ता.२७: मागील सहा-सात दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज भर पावसात गडचिरोली तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

तनुश्री आत्राम यांनी येवली येथील तलाठी श्री.वासनिक यांच्यासमवेत येवली, गोविंदपूर, दर्शनी इत्यादी गावांना भेट देऊन पुराने बाधित शेतीची पाहणी केली. शिवाय मुडझा येथील तलावाची पाळ फुटल्याने शेती आणि मच्छिमार समाजाचे मोठे नुकसान झाले. तनुश्री आत्राम यांनी या तलावाचीही पाहणी केली. शिवाय नुकसानग्रस्त शेतकरी आणि मच्छिमार बांधवांशी चर्चा केली. शासनाने तत्काळ पूरबाधित शेती आणि घरांचे सर्वेक्षण करुन पीडित नागरिकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तनुश्री आत्राम यांनी प्रशासनाकडे केली आहे.

वाकडीच्या शाळेत वृक्षारोपण

पूरग्रस्त भागाची पाहणी करताकरता तनुश्री आत्राम वाकडी गावात पोहचल्या. यावेळी त्यांनी गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वृक्षारोपण केले. याप्रसंगी शिक्षकवृंद आणि नागरिक उपस्थित होते.                                            ===========================                          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*                                               ===========================          कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here