==============================
*लखमापूर येथील हनुमान मंदिरात भर पावसात भव्य रोग निदान शिबिर संपन्न* =============================== *‘अहिल्यादेवी होळकर’ यांच्या नावे केलेली आरोग्य सेवा हि “ईश्वरी सेवा”: डॉ. मंगेश गुलवाडे* =============================== *चंद्रपूर* ============================= पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मस्तोव नागरी समितीच्या वतीने दिनांक 28 /7 /2024 रोज रविवारी ला लखमापूर येथे रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते तेथील सर्व नागरिकांनी सदर आरोग्य शिबिराला भर पावसात उस्पूर्त प्रतिसाद दिला. या आरोग्य शिबिरामध्ये कान, नाक,घसा, दंतरोग, त्वचारोग, रक्त तपासणी, ब्लड शुगर, बी.पी. इत्यादीची तपासणी करण्यात आली. सदर तपासणीमध्ये शहरातील सर्व प्रसिद्ध डॉक्टर उपस्थित राहून हे आयोजन यशस्वी करून घेतले. =============================== या आरोग्य शिबिरात डॉ.मंगेश गुलवाडे, डॉ. सुशील मुंदडा, डॉ.जयंत मुर्तिजापूरकर, डॉ. पूजा मुर्तीजापुरकर तसेच समितीचे सहकोषाअध्यक्ष डॉ. यशवंत कन्नमवार हे उपस्थित होते. शहरातील प्रसिद्ध डॉक्टर्स उपस्थित असल्यामुळे भर पावसात नागरिकाची गर्दी लांबच लांब होती हे या शिबिराचे वैशिष्ट्य ठरले. जिल्हा सामान्य रुग्णालय येथील परिचारिका प्राची कायरकर व रश्मी कोपरे यांचे सुद्धा सहयोग मिळाले. =============================== सदर शिबिराला यशस्वी करण्याकारिता समितीचे कोषाध्यक्ष निलेश काळे, संदीप देशपांडे, सुदर्शन मिश्रा ग्रामपंचायत सदस्य लखमापूर, राधेश्याम धुर्वे, चंद्रकांत वासनिक, अरिफ शेख, सुशील निर्मलकर, जितेंद्र ठाकूर, राजकुमार डोंगरे यांनी अथक परिश्रम घेतले . ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ *कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे*
*संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356*
*उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,*