=================================
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या पदभरतीची निवड यादी घोषित. ============================
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती मागणी. विद्यार्थांनी मानले आ. जोरगेवार यांचे आभार
============================= जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल २ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आला असला, तरी अंतिम पदभरती निवड यादी घोषित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सदर निवड यादी तात्काळ घोषित करण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीची दखल घेतली असून सदर परीक्षेची शिफारस यादी, प्रतिक्षा यादी, कट-ऑफ गुण आणि अपात्र उमेदवारांची यादी घोषित केली आहे. =============================== जलसंपदा विभागामार्फत डिसेंबर २०२३ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. सर्व पदांच्या परीक्षा डिसेंबर २०२३ मध्येच घेण्यात आल्या, आणि त्यानुसार ०२ मार्च २०२४ रोजी निकाल देखील जाहीर करण्यात आला. मात्र, निकाल जाहीर होऊन चार महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही विभागामार्फत तात्पुरती आणि अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली नव्हती. विभागामार्फत आदर्श आचारसंहितेचे कारण देण्यात येत होते. मात्र या काळात विविध जिल्हा परिषदांनी निकाल जाहीर करून कागदपत्र पडताळणीसाठीची प्रक्रिया पूर्ण केल्याचे आढळून आले होते. आधीच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता असल्याने शासकीय कामकाजात दिरंगाई होत आहे. त्यातच जलसंपदा विभागातील निवड प्रक्रियेअंतर्गत अंतिम निवड यादी जाहीर करण्यात होत असलेली दिरंगाई योग्य नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. =====================≠============ या संदर्भात त्यांनी मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या पदभरती अंतर्गत विनाविलंब निवड यादी घोषित करण्यासाठी संबंधितांना तातडीने आदेश देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, सदर भरती प्रक्रियेची शिफारस यादी, प्रतिक्षा यादी, कट-ऑफ गुण आणि अपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. तर विद्यार्थांनी ही आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेत आभार मानले आहे. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== *कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे*
*संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356*
*उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,*