================================
राजुरा (ता.प्र) :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वहस्ते राखी बनवून त्या राख्या वृक्षांना बांधल्या. वृक्षांना राखी का बांधावी व वृक्षाचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे व त्याचे संवर्धन आपण सगळ्यांनी करावे याबाबतची माहिती स्काऊट मास्टर सुभाष पिंपळकर यांनी सांगितले व हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू , मुख्याध्यापक रफिक अन्सारी, स्काऊट मास्टर सुभाष पिंपळकर, सुशील वासेकर गाईड शिक्षिका संगीता लांडे, रितू साठोने आणि शाळेतील शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ================================== *“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























