============================= *चंद्रपूर* ============================= दिनांक 24/08/2024 लां शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी मान. श्रीकांत दादा होवाळ, प्रदेशाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य यांनी चंद्रपूर येथील सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना होणाऱ्या विधानसभे बाबत मार्गदर्शन केले. बहुजन मुक्ती पार्टी कडून चंद्रपूर व राजुरा अश्या दोन विधानसभा लढविल्या जाणार आहे. चंद्रपूर विधानसभा करिता श्री. डॉ. प्रकाश रामटेके तसेच राजुरा विधानसभा करिता श्री. प्रवीन कुमरे यांची नावे निश्चित झालेली आहे. सदर सभेकरिता बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी श्री. विवेक खोबरागडे, श्री. गौतम नगराळे, श्री. अरविंद अंबुलकर, श्री. धनराज गेडाम, श्री. पडवेकर, श्री. कांबळे, श्री. दिनेश शाक्य, श्री. एकनाथ येरमे, श्री. दिगांबर पेंदोर, श्री. किसनराव कोटणाके मोकाशे, श्री. अरुण कुमरे, श्री. देवानंद कुमरे, श्री. नितीन आत्राम, श्री. विशाल भसारकर, श्री. चेतन चीने, श्री. विकास काळे, श्री. तेलतुंबळे व मास्टर गेडाम उपस्थित होते. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,