*कन्नाके परिवाराने केला मरणोत्तर देहदानाचा संकल्प!*

0
33

=============================

*चंद्रपूर*       =============================                छत्रपती नगर तूकुम चंद्रपूर येथे वास्तव्याला असलेले राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष आणि सुविख्यात समाजसेवी डॉक्टर देव कन्नाके यांनी त्यांच्या 55 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून त्या प्रकारचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर चे संकल्प पत्र नुकतेच भरून दिले आहे. अखिल भारतीय अनिस तर्फे राबविण्यात येणाऱ्या देहदान व नेत्रदान चळवळीला भरीव सहकार्य देत अभा अनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप अडकिने यांच्याकडे ते संकल्प पत्र त्यांनी भरून दिले आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्या या आदर्श संकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांच्या सहचारीणी ईश्वरी यांनी पती डॉक्टर देव कन्नाके यांच्या विचाराला अनुमोदन तर दिलेच परंतु स्वतःचा पण मरणोत्तर देहदानाचा विचार बोलून दाखवून स्वतःचा पण फार्म भरून दिला. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार डी के आरीकर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे उपस्थित होते. कन्नाके परिवाराने दाखविलेल्या या वैचारिक धारिष्ट्याचे समाज मनात कौतुक होत आहे.      ==============================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ==============================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here