Home
Home चंद्रपूर *संविधान चौक नागपूर येथे आदिवासी गोंड गोवारी जमाती च्या ठिय्या आंदोलनात खेमराज...

*संविधान चौक नागपूर येथे आदिवासी गोंड गोवारी जमाती च्या ठिय्या आंदोलनात खेमराज भाऊ नेवारे यांचा समाजबांधव, भगिनींसह सक्रिय सहभाग*

0
145

================================

आज अनुसूचित जमाती गोंड गोवारी समाजाचे विविध मागण्या घेऊन प्रशासनाविरुद्ध एकत्रित लढा देण्यासाठी संविधान चौक नागपूर येथे ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात महाराष्ट्रातील अनेक संघटनांचा सहभाग होता तसेच आरमोरी विधानसभेचे गोंड गोवारी समाजाचे युवा नेतृत्व, संघटक खेमराज भाऊ नेवारे हे सुद्धा आपल्या समाजाच्या सेवेसाठी सहभागी झाले. याप्रसंगी त्यांनी उपोषणकर्ते सचिन भाऊ चचाणे, किशोर भाऊ चौधरी, चंदन भाऊ कोहरे यांची भेट घेऊन आरमोरी विधानसभेतील समाजाचे प्रश्न, विविध राजकीय पक्षांमध्ये गटा गटात विभागलेल्या गोंड गोवारी समाजाचे एकीकरण करणे, शैक्षणिक सोय उपलब्ध करणे,प्रत्येक गावी स्मारक व समाजमंदिर बांधणे, पेन्शन सुविधा, पिककर्ज, उद्योग कर्ज, शासनाच्या सवलती अशा मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी खेमराज भाऊ नेवारे यांनी उपोषण कर्त्यांसमोर निर्धार केला. ==============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*      ===============================                कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here