================================
*रामगिरी महाराज व आमदार नितेश राणेंवर कारवाई करा* ==============================
*मुस्लिम समाजातर्फे मूक मोर्चा काढून ठाणेदारांना निवेदन* ================================ भद्रावती(वि.प्र.):
आपल्या वक्तव्याने समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराज व आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शहरातील मुस्लिम समाजातर्फे मूक मोर्चा काढून ठाणेदारांना निवेदन सादर करण्यात आले. सदर मूक मोर्चा जामा मस्जिद चौकातून बाबासाहेब आंबेडकर चौक पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आला.
मुस्लिम समाजाच्या सहवासात राहणारे हिंदू सुरक्षित नसल्याचे विधान रामगिरी महाराज यांनी करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे विरोधात अपमान जनक वक्तव्य केले. रामगिरी महाराजांच्या या वक्तव्याचे समर्थन करीत आमदार नितेश राणे यांनी रामगिरी महाराजांवर कारवाई केल्यास मज्जिद मध्ये घुसून मारण्याची भाषा वापरली. त्यामुळे मुस्लिम समाजात आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे रामगिरी महाराज व आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मूक मोर्चात भद्रावती शहरातील सर्व मस्जिद इमाम व समस्त मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. ================================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,