*गोसेखुर्द ते इटियाडोह नवीन कालव्याची निर्मिती करणे व तयार कालव्याद्वारे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव खेमराज भाऊ नेवारे यांनी शासनासमोर मांडला.*

0
4

================================

विदर्भाची महत्वकांक्षी इंदिरासागर गोसेखुर्द धरण योजना 40 वर्षांपूर्वी अंमलात आली. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात वैनगंगा नदीवर 11.35 कि.मी.लांबीचे धरण शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी बांधण्यात आले. राज्यातील एकमेव राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या पूर्व विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पाचे काम 40 वर्षांपासून अपूर्ण आहे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य सिंचन सुविधा उपलब्ध न होता उलट यामुळे दरवर्षी पुरपरिस्थिती निर्माण होऊन शेतकरी व शासनाचे नुकसान होते. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून गोसेखुर्द ते इटियाडोह प्रकल्पाला कालवा जोडून ईटियाडोह प्रकल्पाच्या माध्यमातून ते पाणी कोरची,कुरखेडा,मालेवाडा, धानोरा व गडचिरोली या मार्गाने प्रवाहित करावे या प्रकारे सिंचन सुविधा निर्माण करण्यास काही हरकत नाही.जेणेकरून शेतकऱ्यांना दुबार, बहू पिके घेऊन आर्थिक उन्नती साधता येईल.
तसेच गडचिरोली जिल्ह्यातील वन्यप्राणी यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.इतर कालवे अपूर्ण असल्यास ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे जेणेकरून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा व वन्यप्राण्यांचा संघर्ष टाळण्यास नक्कीच मदत मिळेल.अशाप्रकारे पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन केल्यास वारंवार पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही निदान आता तरी या बाबत शासनाने दखल घेऊन आरमोरी विधानसभेच्या शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न सोडवावे.
अशी मागणी खेमराज भाऊ नेवारे यांनी कार्यकर्त्यांसोबत उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली. याप्रसंगी खेमराज भाऊ नेवारे,तुषार रहाटे,महेश कुमार मडावी,खुशाल होळी,नरेश वासनिक तथा अनेक शेतकरी उपस्थित होते.      ==============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*      ===============================                कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here