================================
*◆अहेरी◆*
येलचिल येथील किशनीबाई भलावी ही गंभीर आजाराने ग्रस्त असून घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे, उपचार घेण्यास अडचण होत आहे म्हणून येलचिल गावात वर्गणी गोळा केल्यावरही उपचारास पैसे कमी पडत होते.
ही बाब वेलगुर ग्रामपंचायत चे सरपंच किशोर आत्राम यांनी आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना सांगीतल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी तात्काळ उपचारासाठी आर्थिक मदत करून सहकार्य केले.
या वेळी वेलगुर सरपंच किशोर आत्राम,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,मधुकर मडावी,माजी सरपंच दिलीप गंजीवार,उमेश आत्राम,संजय आक्केवार,विनोद कावेरी,अंकुश दुर्गे,मोरू कोटरंगे,सुनील जंगमवार,जुलेख शेख,संदीप बडगे,माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























