==============================
*कोरपना* ===============================
कोरपना शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन तर्फे पंधरावा जागतिक फार्मासिस्ट डे बुधवार दिनांक २५ ला कोरपना येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी येथील स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाला फळ वाटप करण्यात आले. २००९ साली आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशन ( एफ आय पी ) या संघटनेने स्थापना दिवसाच्या औचित्याने २५ सप्टेंबर ची जागतिक फार्मसीस्ट डे म्हणून निवड केली. या दिवसापासून हा दिवस जागतिक फार्मसिस्ट डे म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचा प्रमुख उद्देश जगभरातील फार्मासिस्ट आणि त्यांचे आरोग्य सेवेत महत्वपूर्ण योगदानाची जाणीव करून देणे आहे. फार्मासिस्ट हे केवळ औषधी देणारे नसून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि औषधाच्या योग्य वापरासाठी महत्त्वाचे योगदान देतात. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ तुमराम, डॉ स्नेहा गेडाम , डॉ. संगीता भंडारी , कोरपना शहरातील केमिस्ट दिलीप जेनेकर, सतीश डाहुले, सुरेंद्र ठवसे , सचिन मालेकर,दिवाकर वडस्कर, राहुल राजूरकर, ईश्वर खनके, किसन बांदुरकर , जयंत जेनेकर,
प्रतिक कोटावार, संकेत मोडक, गणेश शिरसागर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले. तसेच जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त केमिस्ट बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,