*अमेरिकेच्या मेक्सिको शहरातून आलेल्या विदेशी पाहुण्यांची खेमराज भाऊ नेवारे यांनी घेतली भेट .*

0
23

================================= 

अमेरिका मेक्सिको येथून आलेल्या विदेशी पाहुण्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील रेशीम संगोपन केंद्राला भेट घेतली.रेशीम उद्योग निर्मिती संदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली.राकेश उमरेडकर यांनी खेमराज भाऊ नेवारे व नरेश वासनिक यांच्याशी संपर्क साधून विदेशी पाहुणे जॅकलीन, अलेक्झांड्रा, जेसिका यांची भेट करून दिली.त्यांनी विदेशी पाहुण्यांचे स्वागत केले व आभार मानले.विदेशी पाहुण्यांसोबत रेशीम उद्योग विषयावर चर्चा करण्यात आली.भारतीय संस्कृतीचा व प्रकल्पाचा अभ्यास करून विदेशात तो सुरू केला जातो परंतु आपल्या भागात प्रकल्प सुरु असूनही त्याकडे मात्र नेहमी दुर्लक्ष केले जाते.
आरमोरी येथील रेशीम संगोपन केंद्राच्या माध्यमातून कुरखेडा, कोरची,मालेवाडा,धानोरा, वडसा या भागात रेशीम (कोषा )प्रकल्प निर्माण करून शेतकरी, बेरोजगार, मजूरवर्ग, विणकाम कारागीर यांना नव संजीवनी मिळून निश्चितच बेरोजगारी दूर होईल.या भागात रेशीम कापड निर्मिती कारखाना/उद्योग तयार करण्यासाठी खेमराज भाऊ नेवारे कटिबद्ध राहून आरमोरी विधानसभेच्या अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार संधी निर्माण होईल.
असे मोठे प्रकल्प निर्माण करण्याची मागणी मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे खेमराज भाऊ नेवारे निवेदनाद्वारे पत्र व्यवहार करणार.

*आरमोरी विधानसभा क्षेत्राचे रोजगार निर्मिती साठी पुढाकार घेणारे युवा उमेदवार.खेमराज वातुजी नेवारे,देसाईगंज*             ================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ===≠===========================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here