Home
Home चंद्रपूर *सरदार पटेल महाविद्यालयाचे ५४ विद्यार्थी झळकले गुणवत्ता यादीत..पाच विद्यार्थी ठरले सुवर्णपदकाचे मानकरी!*

*सरदार पटेल महाविद्यालयाचे ५४ विद्यार्थी झळकले गुणवत्ता यादीत..पाच विद्यार्थी ठरले सुवर्णपदकाचे मानकरी!*

0
71

=================================== 

*चंद्रपूर*       =================================

चंद्रपूर(का.प्र.): येथील सरदार पटेल महाविद्यालयाने मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यापीठस्तरीय गुणवत्ता यादीत झळकण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या घोषित करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत सरदार पटेल महाविद्यालयाचे ५४ विद्यार्थी यंदा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. दरम्यान त्यात पाच विद्यार्थी हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत.

गोंडवाना विद्यापीठाच्या नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या २०२३-२४ च्या गुणवत्ता यादीत सरदार पटेल महाविद्यालयाने भरारी घेतली आहे. यंदा महाविद्यालयाचे मानव विज्ञान विद्या शाखेचे ७, वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेचे १४, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे २९, तर आंतर विद्या शाखा ४ असे एकूण ५४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत.                विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घसघशीत यशात सर्वोदय शिक्षण मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे सामुहिक प्रयत्न व विद्यार्थांच्या परिश्रमाचा महत्वाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी दिली. सर्वोदय शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात अमुलाग्र बदल करण्याच्या उद्दिष्टाने स्थापन केलेली संस्था फक्त संख्यात्मक दृष्ट्या नाही तर गुणात्मक दृष्ट्या सुद्धा वाढलेली या गुणवत्ता यादीच्या निरीक्षणावरून लक्षात येते. विज्ञान विभागाची कीर्ती जीवतानी ही बीएससी या अभ्यासक्रमात गुणाानुक्रमे प्रथम आली असून तिला दोन सुवर्णपदक प्राप्त झाले आहेत. फॅशन डिझायनिंग विभागाची कुमारी चांदणी धनकर तिने विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधून इंद्रधनुष्य या राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवात सर्वाधिक पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल तिला सुद्धा सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.

दिनांक 2 ऑक्टोबर 24 रोजी गोडवाना विद्यापीठात झालेल्या दीक्षांत समारंभात या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सीपी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

आगामी कालावधीत या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयामध्ये गौरव सोहळा आयोजित करून यथोचित सन्मान केल्या जाणार आहे.
दरम्यान या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर,जीनेश पटेल यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार व सर्व प्राध्यापकवृदांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*        ==================================        कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here