महाकाली महोत्सवात हंसराज रघुवंशी च्या सुरांनी उसळला भक्तीचा महासागर

0
19

================================         

१० हजार भाविकांनी घेतला भक्तीगीतांचा आनंद

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संयोजनातून श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टच्या वतीने आयोजित श्री माता महाकाली महोत्सवाच्या सांस्कृतिक संध्याकाळी सुप्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांच्या भक्तिपूर्ण गायनाने वातावरण भक्तिरसाने ओथंबले. जवळपास १० हजार भाविकांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या संगीतमय सुरांनी भक्तिरसाची उधळण करत महोत्सवाला एक अनोखी गोडी दिली.              संध्याकाळच्या आरतीनंतर सुरू झालेल्या या भक्तिसंगीताच्या स्वरांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. “मेरा भोला है भंडारी” आणि “हे शंकरा” अशा लोकप्रिय गाण्यांनी त्यांनी सर्वांना भावविभोर केले. त्यांच्या ओजस्वी आवाजात गुंफलेल्या गाण्यांनी प्रत्येकाच्या मनात श्रद्धेची ज्वाळा चेतवली.    ===============================  महाकाली महोत्सव मंडळाच्या वतीने हंसराज रघुवंशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महाकाली मातेची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार आणि महोत्सव ट्रस्टचे पदाधिकारीही या प्रसंगी उपस्थित होते.                                                                हंसराज रघुवंशी यांच्या गाण्यांनी भाविकांना गाण्यातील आध्यात्मिकतेची अनुभूती दिली. त्यांच्या गायनाच्या स्वरांनी महोत्सवात उपस्थित भाविकांना एक दिव्य अनुभूती मिळाली. महोत्सवात रंगलेला भक्तिरस त्यांच्या गायनाच्या स्वरांनी खुलला. महोत्सवाच्या या संध्याकाळी सर्वांनी श्रद्धेची गोड लहर अनुभवली. हंसराज रघुवंशी यांच्या सुरेल भक्तीगीतांनी महाकाली महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची संध्याकाळ संस्मरणीय ठरली.  ================================   सकाळी ९ वाजता महाआरतीने कार्यक्रमांना सुरुवात झाली. नंतर गायत्री परिवाराच्या वतीने शक्ती संवर्धन व पर्यावरण संरक्षण महायज्ञ पार पडला. तर उद्या सकाळी ९ वाजता श्री माता महाकाली आरतीने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. १० वाजता शहरातील विविध भाषीय भजन कार्यक्रम पार पडणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ५ वाजता श्री माता महाकालीची आरती होणार असून संध्याकाळी ६ वाजता युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन, आणि रात्री ९ वाजता नागपूर येथील रीम्पू चंचल आणि पवन ग्रुपच्या वतीने भक्तिमय संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.         ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  ===============================                  कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशेसंपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356 उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here