Home
Home चंद्रपूर *पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळ मंजुर*

*पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळ मंजुर*

0
72

===============================

*पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळ मंजुर*             ==============================            *अ. भा. ग्रा. पत्रकार संघाच्या मागणीला यश*   ==============================              *चंद्रपूर*        ==============================     राज्यातील पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पत्रकार, तसेच वृत्तपत्र विक्रेंत्याच्या कल्याणासाठीच्या विविध योजना या महामंडळांमार्फत चालवण्यात येतील. या दोन्ही घटकांची महामंडळ स्थापन करावी, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाची अनेक वर्षांपासूनची होती. कॅबिनेट बैठकीच्या या निर्णयाचे अ.भा.ग्रा. पत्रकार संघाने स्वागत केले आहे.                                                            लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना कल्याण योजना, जाहिराती वितरण, अधिस्विकृती, सन्मान योजनांचे  सुलभ आणि पारदर्शक पध्दतीने लाभ मिळावेत, पत्रकारांच्या मागण्यांच्या मागण्यांवर शिघ्रगतीने निर्णय होऊन उतारवयातील ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानयोजनेतील निवृत्ती वेतन योग्य वेळेत मिळावे, तसेच ईतर सामाजिक साधनेत आपल्या लेखण्या झिजवणाऱ्या सर्वच पत्रकारांना पात्रतेनुसार वेळीच न्याय मिळावा यासाठी पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी वेगवेगळी स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याची मागणी अ. भा. ग्रा. पत्रकार संघ (भारत) कडून गेल्या वर्षांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडे सातत्याने सुरू होती. तसेच दिनांक ४ जानेवारी २०२४  देवाशिष लॉन, जळगांव (जामोद) येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनातील ठरावामध्ये ही  महामंडळे स्थापनेची मुख्य मागणी होती. राज्य अधिस्वीकृती समीतीचे राज्य अध्यक्ष यदु जोशी हे अधिस्वीकृती समीतीचे अध्यक्ष झाल्यानंतर अमरावती येथील प्राईम पार्क हॉटेल वरील सत्कार समारंभात पत्रकारांच्या  विषयावरील निवेदनात मडामंडळाची मागणी केली होती व या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन सुध्दा त्यांनी दिले होते. यानंतर गुरूवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकुण ८० निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये पत्रकार महामंडळ आणि वृत्तपत्र विक्रेता महामंडळ अशी दोन स्वतंत्र मंडळाच्या निर्मितीला राज्यशासनाची मंजुरात मिळाली आहे. या निर्णयातून  पत्रकारांनाही न्याय देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांचे अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, केंद्रीय सचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, महिला मंच प्रदेश अध्यक्ष जयश्री पंडागडे, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक यावूल, केंद्रीय सदस्य माणिक ठाकरे, प्रदीप जोशी, केंद्रीय विधी सल्लागार ॲड. किरण भुते, केंद्रीय संपर्क प्रमुख प्रा. रवींद्र मेंढे, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर, मनोहर चरपे, संजय कदम, अभिमन्यू भगत, अंबादास सिनकर, प्रदेश सचिव राजेंद्र ठाकरे, घनश्याम पालिवाल, प्रदेश संघटक रविंद्र तिराणिक , कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे , प्रदेश प्रसिद्ध प्रमुख शहजाद खान , नितीन अशोकराव पवार यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांनी आभार मानले आहे.   =================================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==================================        कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here