Home
Home चंद्रपूर चंद्रपूरचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय: राहुल पावडे नगीनाबाग प्रभागात विकास...

चंद्रपूरचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय: राहुल पावडे नगीनाबाग प्रभागात विकास कामांचे भूमिपूजन माजी उपमहापौर तथा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या हस्ते संपन्न

0
67

===============================

चंद्रपूरचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय: राहुल पावडे
==============================
नगीनाबाग प्रभागात विकास कामांचे भूमिपूजन
==============================
माजी उपमहापौर तथा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या हस्ते संपन्न
==============================
चंद्रपूर:- येथील नगिनाबाग प्रभाग क्रमांक 9 येथील जगन्नाथ बाबा मठ परिसरातील विकास कामांचे भूमिपूजन माजी उपमहापौर तथा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. नगीनाबाग प्रभागातील नागरिकांनीं सुविधेसाठी ओपन स्पेस विकसित करण्याची मागणी लावून धरली होती.विषयाचे गंभीर्य लक्षात घेत माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात ही मागणी पूर्णत्वास नेली आहे.
राहुल पावडे यांनी सदरहू विषयासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर मनपा निधी अंतर्गत रू 43 लक्ष 23 हजार 800 रुपये निधी मंजूर करण्यात आला.फक्त नगीनबाग नाही तर चंद्रपूरचा सर्वांगीण विकास हाच आमचा उद्देश असल्याचे भूमिपूजन करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे म्हणाले.                           
या भूमिपूजन कार्यक्रमास प्रामुख्याने प्रभागातील माजी नगरसेवक बंटी चौधरी, सविता कांबळे, वंदना तिखे, व महेश राऊत, अमित गौरकार, पुण्यपवार, डांगेवार, मते, नामपल्लीवार, पिंपळकर, पाटील ताई, रेड्डी, चेडे, ताई महेश दरवे,अमित वाघदरकर, तसेच  वार्डातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ================================
कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here